पुण्याच्या 7 वर्षाच्या देशनाने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने घेतली नोंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील 7 वर्षीय देशना नहारने लिंबो स्केटिंगमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड (world record) बनवला आहे. तिने चीनच्या 14 वर्षीय किशोरीचा रेकॉर्ड मोडत विश्वविक्रम (world record) आपल्या नावावर केला आहे. अवघ्या 13.74 सेकंदात तिने 20 मोटार कारच्या खालून जात तिने हा वर्ल्ड रेकॉर्ड (world record) केला आहे. या अगोदर हा रेकॉर्ड चीनच्या 14 वर्षीय किशोरीच्या नावावर होता. तिने 14.15 सेकंदात हा रेकॉर्ड केला होता. त्या रेकॉर्डच्या 7 वर्षानंतर आता किशोरीपेक्षा वयाने 7 वर्षाने लहान असलेल्या देशनाने तिचा रेकॉर्ड मोडत विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे.

देशना आदित्य नहार असे विश्वविक्रम करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. ती अवघी 7 वर्षांची आहे. तिच्या या विश्वविक्रमाची (world record)  दखल घेत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (world record) समितीने प्रमाणपत्र देऊन तिचा गौरव केला आहे. तिसरीच्या वर्गात शिकणारी देशना वयाच्या 5 व्या वर्षांपासून लिंबो स्केटिंगचा सराव करते. दोन वर्ष तिने घेतलेल्या मेहनतीचे हे फळ असल्याचे कुटुंबीयांनी म्हंटले आहे.

देशनाने आतापर्यंत देशभरातील अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. स्केटिंगमधील विविध स्पर्धांमध्ये तिला सुमारे 16 प्रमाणपत्रे आणि 40 पदके मिळाली आहेत. यापुढे तिचे 100 कारच्या खाली स्केटिंग करण्याचे ध्येय असल्याचे तिने सांगितले. अशक्य वाटणारी गोष्ट देशनाने अवघ्या सातव्या वर्षी पूर्ण केल्याने (world record) देशाचे नाव उंचावले आहे.

हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर

आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!

IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार

‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर