70 वर्षीय शेतकऱ्याचा जुगाड : काटेरी वनस्पतींमध्ये फुलवली पेरुची बाग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेती करत असताना अनेक शेतकरी असे आहेत कि ते डोक्यात आलेली कल्पना लगेच शेतीत अंमलात आणतात. काहीतरी जुगाड करून शेतीतून भरघोस उत्पन्न काढतात. असाच जुगाड इटावा येथील रहिवासी असलेल्या 70 वर्षीय शेतकरी रामसिंह राठोड यांनी केला आहे. त्यांनी काटेरी वनस्पती असलेल्या सुमारे दीड एकर जमिनीत फळांची शेती केली असून त्यातून चांगले उत्पन्न काढले आहे. कोणत्याही कामाला वयाचं बंधन नसते, हेच राठोड यांनी दाखवून दिले आहे.

इटावा हे ठिकाणी यमुना आणि चंबळ नदीच्या खोऱ्यात बसलेले आहे. बाबूळशिवाय काटेरी वनस्पती आहेत. येथील शेतकरी रामसिंह राठोड यांना शेतीत अनेक प्रयोग करण्याची भारी हौस. ते कायम काहींना काही तरी शेतीत पिके घेऊन त्यातून उत्पन्न घेतात. यामध्ये जास्तकरून कमी कालावधीत कशा प्रकारे जास्त उत्पन्न घेता येईल याकडे राठोड यांचा जास्त कल असतो. त्यांनी काटेरी वनस्पती असलेल्या जमिनीत पेरू व लिंबू लावण्याचे ठरवले. मग त्यांनी पेरुची 200 रोपे लावली. याबरोबरच अनारचे 190, तर लिंबूचे 100 रोप लावले.

Ramsingh Rathod

शेतकरी मित्रांनो सध्या अनेक शेतकरी तंत्रज्ञानाचा वापर करून हायटेक शेतीतून आपला नफा दुप्पट करत आहेत. यासाठी Hello Krushi अँप शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची भूमिका पार पाडत आहे. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi हे ॲप Download करून Install करा. Hello Krushi मध्ये तुम्हाला कृषी विद्यापीठांमधील नवनवीन संशोधनाची माहिती पहायला मिळते. तसेच सातबारा, जमिनीचा नकाशा सोप्या पद्धतीने डाउनलोड करता येतो. रोजचा बाजारभाव इथे समजतो. तसेच शेतकरी ते ग्राहक अशी थेट खरेदी विक्रीही या अँपच्य माध्यमातून करता येते.

Hello Krushi हे अँप Download करण्यासाठी Click Here

guava farming

अशी केली शेतीला सुरुवात

70 वर्षीय रामसिंह राठोड हे सुरुवातीला शहरात दुकान चालवत होते. त्यांनी कामेट गावात जमीन खरेदी केली. मात्र, त्यांच्या जमिनीच्या मागे भूमाफिया लागले. जमिनीच्या संरक्षणासाठी रामसिंह शेतात घर बांधून राहू लागले. शेतीला कुंपण केले. काही भागात मोहरीची लागवड केली. त्यानंतर शेतीत त्यांना आवड निर्माण झाली. त्यामुळं त्यांनी पेरु,अनार, लिंबूची रोपे लावली.

drip irrigation

सिंचनासाठीही केला जुगाड

यमुना आणि चंबळ नदीच्या खोऱ्यात बसलेले इटावा हे ठिकाणी आहे. या ठिकाणी शेतात पाण्याची कमतरता होती. त्यामुळे रामसिंह राठोड यांनी फळझाडांना भरपूर पाणी देता यावे यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला. यातून थेंब-थेंब पाणी रोपांना मिळते. वर्षभर पहारेदारी केल्यानंतर त्यांनी सुमारे 500 रोपांची लागवड केली.

guava पेरु

फळझाड लागवडीतून ‘इतका’ फायदा

शेतकरी रामसिंह यांनी पेरु रोपांबरोबर इतर फळांचीही रोपे लावली आहेत. पहिले उत्पन्न त्यांनी गरजू, नातेवाईक तसेच मित्रमंडळींना मोफत दिले. पुढच्या वर्षीपासून ते दरवर्षी सुमारे 3 लाख रुपयांचे उत्पन्न घेऊ शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Peru Plants

पेरूमध्ये असतात ‘हे’ पोषक तत्व

पेरू हे असे एक फळ आहे जे स्वस्त तर आहेच पण सर्वांच्या आवडीचे आहे. पेरू हे चवीला आंबट-गोड असून ते पोटासाठी खूप फायदेशीर फळ आहे. यामध्ये काही पोषक तत्व असतात. पेरूमध्ये अँटीमाइक्रोबियल, अँटीफंगल, व्हिटॅमिन सी, के, बी6, फोलेट, नियासिन, अँटीडायबेटिक, अतिसारविरोधी, लोह, फॉस्फरस, कॅल्शियम, पोटॅशियम, जस्त, तांबे, कार्बोहायड्रेट, आहारातील फायबर इत्यादी पोषक तत्व असतात. हे पोटाशी संबंधित समस्या टाळते. पेरू खाल्ल्याने बद्धकोष्ठता सारखी समस्या उद्भवत नाही. आहारातील फायबर असल्याने ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. अशा स्थितीत मधुमेहाच्या रुग्णांनी पेरूचे सेवन अवश्य करावे.