Satara News : सातारा जिल्ह्यातील ‘या’ 3 साखर कारखान्यांकडून तब्बल 77.40 कोटींची FRP थकीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्र जास्त आहे. जिल्ह्यात साखर कारखान्यांचा पट्टा पडला आहे. यावर्षी काही कारखान्यांनी गाळप होण्यापूर्वी ऊस दर जाहीर केले नाहीत. साखर कारखाने बंद झाले असले, तरी एफआरपी देण्यात 3 साखर कारखाने पिछाडीवर आहेत. जिल्ह्यातील 3 साखर कारखान्यांकडून तब्बल 77.40 कोटी रुपयांची FRP थकीत आहे.

यावर्षी कारखान्यांचा पट्टा 15 मार्चपर्यंत पडला आहे. थकीत एफआरपी ठेवणाऱ्या कारखान्यांमध्ये प्रामुख्याने किसन वीर कारखान्याचेच 34.75 बाकी आहेत. अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याची देय रक्कम १५७.७६ कोटी असून १८२.६५ कोटी रक्कम अदा केली आहे. बाळासाहेब देसाई साखर कारखान्याने रक्कम ५०२८.४९ कोटी असून ५४.२४ कोटी रक्कम अदा केली आहे. किसनवीर सहकारी साखर कारखान्याची देय रक्कम १०८.१० कोटी असून ७३३५.६८ अदा केले आहेत. या कारखान्याची अद्याप थकीत रक्कम ३४.७५ कोटी इतकी आहे. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची देय रक्कम २१६.५४ कोटी इतकी असून २७३.९३ कोटी अदा केले आहेत.

शेतकरी मित्रांनो सध्या अनेक शेतकरी तंत्रज्ञानाचा वापर करून हायटेक शेतीतून आपला नफा दुप्पट करत आहेत. यासाठी Hello Krushi अँप शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची भूमिका पार पाडत आहे. नवनवीन तंत्रज्ञान, उपकरणे यांची माहिती या अँपवर आहे. यासोबत तुम्हाला कोणतीही शेती उपयोगी उपकरणे अतिशय कमी किंमतीत विकत घ्यायचे असतील तर Hello Krushi अँप मोबाईल वर इंस्टॉल करून तुम्ही थेट Manufacturer कडून ते विकत घेऊ शकता. तसेच कृषी विद्यापीठांमधील नवनवीन संशोधनाची माहिती यावर दिली जाते. याव्यतिरिक्त Hello Krushi मध्ये तुम्हाला सातबारा उतारा, जमीन मोजणी, बाजारभाव, हवामान अंदाज यांसारख्या सुविधाही मिळतील. त्यासाठी Hello Krushi डाउनलोड करा.

Hello Krushi हे अँप Download करण्यासाठी Click Here

स्वराज्य इंडिया ॲग्रो उपळवेची देय रक्कम ११२.८९ कोटी असून १२७.४४ कोटी अदा केले आहेत. खटाव माण ॲग्रो प्रोसेसिंगची देय रक्कम १४०.१९ कोटी इतकी असून कारखान्याने १६७.६७ कोटी अदा केले आहेत. जरंडेश्वर शुगर ४१३.३३ कोटी इतकी रक्कम देय असून ५४५.५२ कोटी रक्कम अदा केले आहेत. खंडाळा सहकारी साखर कारखान्याची देय रक्कम ३१.९६ कोटी असून ३३.६० रक्कम अदा केली आहे. यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखाना देय २४९.८८ कोटी देय असून ३०३.४० अदा केले आहेत.

अथनी शुगर शेवाळेवाडी कारखान्याची देय १०३.९८ असून १५ एप्रिलअखेर १३२.९७ कोटी रुपये अदा केले आहेत. कल्लापाण्णा आवाडे कारखान्याची (श्रीराम, फलटण) देय रक्कम १००.१० कोटी असून ११५.७४ काेटी अदा केले आहेत. जयवंत शुगर्स, धावरवाडी कारखान्याची देय रक्कम १४५.७३ कोटी असून आतापर्यंत १८६.८५ कोटी अदा केले आहेत. ग्रीन पावर शुगरची देय रक्कम १२३.३२ कोटी इतकी असून १०१.०६ काेटी अदा केले आहेत. शरयू ॲग्रो (कापशी) कारखान्याची १७८.१३ कोटी रक्कम देय असून १५७.७४ कोटी अदा केले आहेत. दरम्यान जिल्ह्यात ३ कारखान्यांनी एफआरपीची कोटीच्या घरात रक्कम थकीत ठेवल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.