हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मागील वर्षी राज्यातील सगळ्या शेतकऱ्यांना दुष्काळ सहन करावा लागला होता. यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. येवला तालुक्यात देखील शेतकऱ्यांना खूप खूप नुकसानीचा फटका बसलेला आहे. परंतु आता त्यांच्यासाठी एक दिलासा देणारी बातमी येत आहे. कारण आता सरकारच्या पिक विमा या योजनेअंतर्गत तालुक्यातील जवळपास 77 हजार शेतकऱ्यांना 139 कोटी रुपयांची मदत सरकारकडून जाहीर झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता आर्थिक परिस्थिती सामना करावा लागणार नाही.
मागील वर्षी मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडलेला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले. आणि पर्यायाने त्यांचे आर्थिक नुकसान झाले. यामुळेच शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज काढावे लागले होते. परंतु आता या परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारकडून पीक विमा योजना अंतर्गत मदत जाहीर झाली. या योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. शासनाने आता आदेश दिला आहे आणि पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना रक्कम देण्यासाठी सुरुवात केलेली आहे. आता उर्वरित सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे.
मागील वर्षी सोयाबीन, कांदा, बाजरी, कापूस, मूक आणि भुईमूग या पिकांना दुष्काळाचा फटका बसला. आणि शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे पीक घेता आले नाही. परंतु आता या शेतकऱ्यांना विमाचा लाभ मिळणार आहे. यावेळी तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले की, मागील वर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीक विमा घेतलेला आहे. आणि यामुळे 77 हजार शेतकऱ्यांना संरक्षित रक्कम प्राप्त केली असेल. तालुक्याचा मोठा भाग लाभ झालेला आहे. ज्या शेतकऱ्यांनी मागील वर्षी पीक विमा उतरवला होता. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याचप्रमाणे यावर्षी देखील प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे यावर्षी देखील आणि शेतकऱ्यांनी हा पीक विमा उतरवलेला आहे. आता यावर्षी मिळालेली मदत शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे आणि त्यांना शेतीमध्ये आता चांगली पिके घेता येईल