रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 78 दिवसांचा बोनस जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी नवरात्रीच्या सणानिमित्त एक आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने 2 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या बैठकीत रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी उत्पादकतेवर आधारित बोनस म्हणजेच पीएलबी (प्रोडक्टिविटी लिंकड बोनस) जाहीर केला आहे. देशभरातील 11 लाख 72 हजार 240 रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मनोबलात वाढ होईल आणि त्यांना दिवाळीच्या तयारीसाठी एक मोठा आर्थिक फायदा मिळेल.

उत्पादकतेवर आधारित बोनस –

2023-2024 या आर्थिक वर्षात भारतीय रेल्वेने उत्कृष्ट कामगिरी दर्शविली आहे. रेल्वेच्या कामकाजातील उत्कृष्टता आणि कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचे कौतुक करण्यासाठी केंद्र सरकारने पीएलबी (प्रोडक्टिविटी लिंकड बोनस) देण्याची घोषणा केली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना दिली जाणारी ही रक्कम दरवर्षी दुर्गापूजा किंवा दसऱ्याच्या सुट्टीआधी मिळणार आहे. यावर्षीही सुमारे 11 लाख 72 हजारांहून अधिक अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या पगारा इतकी रक्कम पीएलबी म्हणून दिली जाणार आहे. यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना सणाच्या हंगामात आर्थिक स्थिरता प्राप्त होईल. हा बोनस त्यांच्या दैनंदिन खर्चात मदत करेल आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत सण साजरा करण्यासाठी एक आनंददायी वातावरण निर्माण करेल.

2000 कोटींहून अधिक निधी मंजूर –

मागील वर्षांपासून रेल्वेने 1588 दशलक्ष टन मालवाहतूक आणि 6.7 अब्ज प्रवासी वाहतूक करण्याचा विक्रम केला आहे. या कामगिरीवरून केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या मेहनतीच्या कौतुकाचे फळ त्यांना देणार आहे. या निर्णयासाठी 2000 कोटींहून अधिक रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. निर्णयामुळे रेल्वेसेवेतील कामकाजात वाढ होण्याची अपेक्षा आहे, कारण बोनस मिळाल्यावर कर्मचाऱ्यांचे मनोबल अधिक उंचावेल.

कोणत्या कर्मचाऱ्यांना लाभ –

या बोनसचा लाभ घेणाऱ्यांमध्ये ट्रेन्स मॅनेजर (गार्ड), स्टेशन मास्तर, पॉइंट्समन, तंत्रज्ञ, तंत्रज्ञ सहाय्यक, ट्रॅक मेंटेनर ,लोको पायलट , गट क मधील कर्मचारी त्याचबरोबर इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हा निर्णय सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांसाठी एकत्रितपणे आर्थिक प्रगती साध्य करण्यास महत्वाचा ठरेल .