व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक! मुलगा न झाल्यामुळे जन्मदात्या पित्यानेच केली 8 दिवसांच्या मुलीची निर्घृणपणे हत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मंगळवारी जळगाव जवळ असणाऱ्या वाकोडच्या हरिनगर तांडा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एका जन्मदात्या पित्यानेच आपल्या 8 दिवसांच्या मुलीची हत्या केली आहे. आशा वर्कर्सच्या सतर्कतेमुळे हा गुन्हा उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. गोकुळ जाधव असे आरोपी पित्याचे नाव आहे. मुलगी झाल्यामुळे संताप व्यक्त करत गोकुळने 8 दिवसाच्या आपल्या मुलीला मारून टाकले. या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ माजली आहे.

आरोपी गोकुळ जाधव आपल्या पत्नी आणि दोन मुलींचा हरीनगर तांडा येथे राहिला होता. त्याची पत्नी तिसऱ्यावेळी गरोदर राहिली होती. 2 सप्टेंबर रोजी या दाम्पत्याला एक गोड अशी मुलगी झाली. परंतु आपल्याला पुन्हा मुलगी झाल्यामुळे आरोपी गोकुळचा संताप अनावर झाला. शेवटी त्याने 10 सप्टेंबर रोजी या तान्ह्या मुलीच्या तोंडात तंबाखू भरून तिची हत्या केली. ज्यावेळी मुलीच्या जन्माची नोंद करण्यासाठी आशा वर्कर्स घरी आले तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला. आता याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे.

आरोपींकडून गुन्ह्याची कबुली

आरोपी गोकुळच्या घरी मुलीच्या जन्माची नोंद लिहून घेण्यासाठी आशा वर्कर्स गेल्या होत्या. मात्र त्यावेळी मुलगी घरी नसल्याचे आरोपीने या आशा वर्कर्सला सांगितले. हीच बाब आशा वर्कर्सने मुख्य अधिकाऱ्यांना सांगितली. त्यानंतर मुख्य अधिकारी मुलीला पाहण्यासाठी घरी आले. तेव्हा आजारपणामुळे गेल्या दोन दिवसांपूर्वी तिचा मृत्यू झाला अशी माहिती आरोपी गोकुळने अधिकाऱ्यांना दिली. परंतु आरोपी गोकुळवर संशय निर्माण झाल्यामुळे अधिकाऱ्यांनी त्याची कसून चौकशी केली. यावेळी मात्र त्याने आपला गुन्हा कबूल करत आपणच मुलीला मारून टाकल्याचे सांगितले. तसेच, फर्दापूर ते वाकोड या रस्त्यावर खड्डा खणून मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची माहिती देखील त्याने अधिकाऱ्यांना दिली. यानंतर अधिकाऱ्यांनी ताबडतोब पोलिसांना बोलावून घेऊन आरोपीवर कारवाई करण्याचे आदेश दिले.