सदनिका हस्तांतरण शुल्कात 50 टक्के कपात! मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8 महत्वाचे निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 7 डिसेंबरपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची विशेष बैठक पार पडली आहे. या बैठकीत एकूण 8 महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच, अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने सादर करण्याचे निर्देश मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आले आहेत. याबरोबर, झोपडपट्टी पुनर्वसन मधील सदनिका हस्तांतरण शुल्कात 50 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

आजच्या बैठकीतील महत्वाचे निर्णय

1) अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने सादर करणार. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार

2) झोपडपट्टी पुनर्वसनमधील सदनिका हस्तांतरण शुल्कात 50 टक्के कपात. झोपडीधारकांना मोठा दिलासा.

3) राज्यात ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान. शाळांचे मूल्यांकन करणार. पहिल्या टप्प्यात ४७८ शाळा.

4) मराठी भाषा भवनाची उभारणी वेगाने करणार.

5) मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी शासन हमी वाढविली.

6) औद्योगिक व कामगार न्यायालयाच्या न्यायाधीशांना सुधारित सेवानिवृत्तीवेतन.

7) ‘महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना – 2023’ राबवून महसुली उत्पन्नात मोठी वाढ करणार.

8) शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग 1 जमिनीसाठी अधिनियमात सुधारणा.