हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हाय व्होल्टेज साताऱ्याचा निकाल लागला… उदयनराजे जायंट किलर ठरत शरद पवारांच्या शशिकांत शिंदेंचा गेम झाला… संपूर्ण महाराष्ट्रात तुतारीची हवा असताना राष्ट्रवादीच्या बालेकिल्लालाच भगदाड पाडत साताऱ्यात ओन्ली छत्रपती हे पुन्हा एकदा दाखवून दिलंय… लोकसभेच्या या निकालातच विधानसभेला काय होणार? याचं पिक्चरही क्लिअर झालंय… साताऱ्याची लोकसभा जितकी घासून झाली त्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त सातारा जिल्ह्यातील या आठ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुका रंगतदार होणार आहेत… लोकसभेच्या निकालाचा अंदाज लावता साताऱ्यात सध्या नेमके कोण 8 आमदार निवडून येतील?…पाटणपासून ते कोरेगावापर्यंत तुमच्या मतदारसंघात आमदार म्हणून कोण निवडून येईल? साताऱ्यातील जनता विधानसभेला कुणाला कौल देणारय? त्याचीच ही स्टोरी…
यातला पहिला विधानसभा मतदारसंघ येतो तो कोरेगाव विधानसभेचा…
2019 च्या लोकसभा पोटनिवडणुकीसोबत झालेल्या विधानसभेला शिवसेनेकडून महेश शिंदे विरुद्ध राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे अशी लढत झाली… तेव्हा मात्र महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांचा पराभव करत कोरेगाव ताब्यात घेतला… नंतरच्या पक्षफुटीच्या राजकारणात शशिकांत शिंदे तुतारीकडे जाऊन लोकसभा लढले आणि पडले देखील… त्यामुळे आता 2024 ला पुन्हा एकदा इथून महेश शिंदे विरुद्ध शशिकांत शिंदे अशीच लढत पाहायला मिळेल… मुख्यमंत्री शिंदे यांचे विश्वासू आणि लोकसभेला उदयनराजेंना लीड दिल्यामुळे यंदाही महेश शिंदे यांची इथली आमदारकी फिक्स समजली जातेय…
दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे सातारा जावळीचा…
सातारा जावळीचे करंट आमदार आहेत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले… त्यांच्या विरोधात होते राष्ट्रवादीचे दीपक पवार. 2019 चं स्टॅटिस्टिक्स पाहिलं तर इथून शिवेंद्रसिंह राजेंनी मोठ्या लीडने सातारचं मैदान मारलं होतं… खरंतर सातारा, जावळी या पट्ट्यात शिवेंद्रसिंह राजे यांची मोठी ताकद आहे… त्यात उदयनराजे प्लस शिवेंद्रसिंह राजे असं लोकसभेला बघायला मिळालेलं समीकरण विधानसभेलाही कायम राहणार असल्यानं शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची ही सीट कन्फर्म समजली जातेय…
साताऱ्यातील तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे वाई – खंडाळा
वाई खंडाळ्याचे विद्यमान आमदार आहेत अजित पवार गटाचे मकरंद आबा पाटील…2019 च्या निवडणुकीत भाजपचे माजी आमदार मदनदादा भोसले यांचा पराभव करत मकरंद आबा जायंट किलर ठरले होते…2024 च्या विधानसभेसाठी महाविकास आघाडीकडे वाई खंडाळ्यातून म्हणावा असा तगडा प्रतिस्पर्धी सध्या रिंगणात नाहीये… दुसरीकडे मदनदादा भोसले यांची प्रदेश कार्यकारणीवर वर्णी लावल्यामुळे ही जागा मकरंद आबांनाच मिळेल हे निश्चित मानलं जातंय..
साताऱ्यातील चौथा विधानसभा मतदारसंघ आहे पाटणचा…
सत्यजित पाटणकर विरुद्ध शंभूराज देसाई अशी इथली पारंपारिक लढत… मात्र 2019 ला देसाईंनी पाटणकरांची गाडी मागे टाकत आमदारकी मिळवलीच… खरंतर पहिलीच टर्म असल्यामुळे शंभूराज देसाईंना म्हणावा असा स्कोप मिळाला नव्हता… पण शिवसेनेतील फुटीनंतर शंभूराज देसाईंच्या राजकारणाला उभारी आली… या सगळ्यात सत्यजित पाटणकर यांचं राजकारण मागे पडलं…याचाच परिणाम म्हणून पाटणकरांना शशिकांत शिंदेंना लीड मिळवून देता आली नाही… याचाच अर्थ येणारे विधानसभेला पाटणकरांपेक्षा शंभूराज देसाईंचं पारड जड दिसतंय…
साताऱ्यातला पाचवा विधानसभा मतदारसंघ आहे कराड दक्षिणचा…
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिणचे करंट आमदार…2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या अतुल भोसले यांनी पृथ्वीराज बाबांना लढत दिली… पण पृथ्वीराज बाबा इथून आरामात निवडून आले… पण आता 2024 मध्ये इथले डायमेन्शन्स बदलले आहेत… ज्या 2019 च्या पोट निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांनी श्रीनिवास पाटलांच्या बाजूने 31 हजारांचं लीड टाकलं होतं त्याच कराडमध्ये उदयनराजे 616 मतांनी लीडला आहेत.. एकूणच कराडात अतुल भोसलेंचा प्रभाव वाढला असला तरी पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रस्थापित राजकारणाला ते धक्का लावतील, अशी सध्या परिस्थिती नाहीये…
साताऱ्याचा सहावा मतदारसंघ आहे कराड उत्तरचा…
कराड उत्तर मधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत… कराड दक्षिण प्रमाण यंदाच्या लोकसभेत तुतारीला इथून मताधिक्य घटलं आहे… अर्थात हा बाळासाहेब पाटलांसाठी मोठा धक्का असू शकतो… 2019 च्या विधानसभेला मनोज दादा घोरपडे तर शिवसेनेकडून धैर्यशील कदमही मैदानात होते… अर्थात महाविकास आघाडी विरोधी सूर लोकसभेला दिसला असला तरी विधानसभेला मात्र स्थानिक प्रश्न महत्त्वाचे असल्याने बाळासाहेब पाटीलच इथून लीड घेतील असा अंदाज आहे… पण मनोज दादा घोरपडे इथून कडव आव्हान उभं करणार असल्याने उत्तरचा निकाल धक्कादायक असू शकतो…
यातला सातवा मतदारसंघ आहे तो फलटणचा…
फलटण हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित असणारा मतदारसंघ… 2019 ला इथून राष्ट्रवादीच्या दीपक चव्हाण यांनी भाजपच्या दिगंबर आगवणे यांचा पराभव करत आमदारकी मिळवली… खरं म्हणजे फलटणमध्ये कुणाला आमदार करायचा? याचा रिमोट कंट्रोल रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हातात असतो…आत्ताची समीकरणे बघितली तर दीपक चव्हाण शिंदे गटात आहेत… तर पराभूत झालेले दिगंबर आगवणे हे शरद पवार गटात… मोहिते पाटलांना फलटण मधून मिळालेलं लीड बघता ते रामराजे प्लस मोहिते पाटील प्लस शरद पवार अशी इथून चुरस झाली तर शरद पवार गटाचा आमदार इथून आरामात निवडून येईल, असं सध्या चित्र आहे… त्यामुळे दिगंबर आगवणे हे तुतारीकडून संभाव्य उमेदवार असतील तर त्यांचा फलटणमधील विजय निश्चित मानला जातोय…
आता बोलूयात आठव्या आणि शेवटच्या मतदारसंघाबद्दल आणि तो म्हणजे माण खटावचा
भाजपचे जयकुमार गोरे इथले स्टॅंडिंग खासदार… प्रभाकर देशमुख विरुद्ध जयकुमार गोरे अशी इथली पारंपारिक लढत.. जयकुमार गोरे हे माण खटावमध्ये बरेच स्ट्रॉंग आहेत…म्हणूनच भाजपच्या रणजितसिंह निंबाळकरांना ते आपल्या मतदारसंघातून लीड देऊ शकले… मुद्दा फक्त असा आहे की मोहिते पाटलांच्या विरोधात यंदा प्रचार केल्याने आता त्याचा फटका त्यांना आपल्या मतदारसंघात किती बसतो हे पाहावं लागेल…तर अशी आहे येत्या विधानसभा निवडणुकीतील आमदारकीच्या रेसमध्ये फ्रंटला असणाऱ्या उमेदवारांची संभाव्य नावं… बाकी तुम्हाला काय वाटतं? साताऱ्याच्या कुठल्या मतदारसंघातून कोण आमदार होईल? आम्ही दिलेला कौल तुम्हाला पटला का? जर तुमचं काही वेगळं मतं असेल तर ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा