पीक विम्याच्या नावाखाली 8 हजार कोटींचा घोटाळा; उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

PM Pik Vima Yojana: कृषी प्रधान देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात आजही अनेक प्रकारची शेती केली जाते. वेगवेगळे प्रांत, तिथले वातावरण, पाण्याची सोय इत्यादी घटकांच्या अनुषंगाने शेतीचे प्रकार ठरवले जातात. देशातील अनेक राज्यांप्रमाणे महाराष्ट्राच्या गावांमध्ये आजही शेतकरी शेतीचा व्यवसाय तेवढ्याच चिकाटीने करतो. कानाकोपऱ्यातल्या याच शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून केंद्र तसेच राज्य सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात, यांपैकीच एक म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजना. मात्र शुक्रवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्ष्याचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना राज्य सरकारवर विमा योजनेबाबत काही गंभीर आरोप केले आहेत. आरोप करताना उद्धव ठाकरे म्हणालेत की, राज्य सरकारने पीक विमा योजनेत तब्बल 8 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊया.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीक विमा योजनेच्या संदर्भात राज्य सरकारवर गंभीर आरोपांचे शस्त्र चालवले आहे. ते म्हणले की, “एक रुपयात पीकविमा मिळणार म्हणून पावणेदोन कोटी शेतकऱ्यांनी अर्ज भरला आहे, पण आता हा एक मोठा घोटाळा आहे कि काय अशी शंका मला येऊ लागली आहे”. त्यांच्या मते राज्य सरकार काही तरी घोटाळा करत असून पैश्यांची विल्लेवाट लावण्यासाठी त्यांनी 8 हजार कोटी रुपयांसमोर विम्याचे नाव लावले आहे. (PM Pik Vima Yojana).

हिंगोलीच्या कर्जबाजारी शेतकऱ्यांनी हताश होऊन आपल्या शरीराचे अवयव सरकारने विकत घेऊन त्यांचे कर्ज माफ करावे अशी मागणी केली होती. मुंबईत आलेल्या याच शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकारानंतरच पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी सदर गंभीर आरोप राज्य सरकारवर लावले आहेत. परिषदेत बोलताना त्यांनी सरकार विरुद्ध संताप व्यक्त केला आहे. पीकविम्याच्या (PM Pik Vima Yojana) नावाखाली 8 हजार कोटी रुपये घेतलेल्या राज्य सरकारची विमा कार्यालये बंद असतात किंवा तिथले कर्मचारी मदत मागणाऱ्यांचा फोन देखील उचलत नाहीत. सरकारचे कर्मचारी त्यांच्याच नियमांचे पालन करत नाही आहेत त्यामुळे केंद्र सरकारकडून मिळालेला पैसा नेमका कोणाच्या खिश्यात जातोय याची चौकशी झाली पाहिजे असेही ठाकरे म्हणाले.

प्रधानमंत्री पीकविमा(PM Pik Vima Yojana) योजना काय आहे?

देशभरातील शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी सरकारकडून राबवली जाणारी योजना म्हणजे पीकविमा योजना होय. याअंतर्गत पाऊस, दुष्काळ, किंवा अन्य कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची पिके नष्ट झाली तर त्यांना योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाते. शेतीचे नुकसान झाल्यानंतर अनेक शेतकरी आत्महत्या करतात, त्यांचा बचाव करण्यासाठी व शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी पीकविमा योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.