8 वर्षांच्या जुळ्या भावांनी सुरू केले 2 Start-Up; 5 लाखांचा निधीही मिळाला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वयाच्या अवघ्या 8 व्या वर्षात 2 जुळ्या भावांनी स्टार्ट अप (Start-Up) उपक्रम सुरु केल्याची अभिमानास्पद माहिती समोर येत आहे. अनय रामकृष्णन (Anay Ramakrishnan) आणि अबीर रामकृष्णन (Abeer Ramakrishnan) अशी या दोन्ही भावांची नावं असून या दोघांच्या नावावर दोन स्टार्टअप आहेत. “एक ट्रॅक्शन स्टेजमध्ये आहे आणि दुसरा अजूनही विचारात आहे. यातील पहिला स्टार्टअप ना नफा ना तोटा या तत्वावर आहे आणि दुसरी एक सखोल टेक स्टार्ट-अप आहे.

गेल्या दोन महिन्यांत त्यांच्या पहिल्या उपक्रमासाठी निधीचा पहिला लॉट म्हणून 5 लाख रुपये मिळाले आहेत. त्यामुळे अनय रामकृष्णन आणि अबीर रामकृष्णन हे नवीन युगातील व्यवसायातील सर्वात तरुण उद्योजकांपैकी एक असू शकतात. त्यांचे वडील आर रामकृष्णन एक इन्व्हेस्टमेंट बँकर आहेत आणि आई प्रिती रामकृष्णन आयटी प्रोफेशनल असून त्यांच्याकडे व्यवस्थापन आणि खर्चाची पदवी आहे.

त्यांचा not-for-profit हा उपक्रम वंचित मुलांसाठी काम करतो. ते देणगीदारांकडून कपडे, खेळणी आणि पुस्तके यासारख्या वस्तू गोळा करतात, जे गरीब मुलांना दिले जातात. चॅरिटी त्याच्या कृतींमुळे कमी झालेल्या कार्बन फूट प्रिंटचीही गणना करते. या वस्तू, उदाहरणार्थ कपड्यांसारख्या, अन्यथा टाकल्या गेल्या असत्या, पण आता त्या चॅरिटी संस्थेच्या माध्यमातून पुन्हा वापरल्या जात आहेत. या वेळी यापैकी एकाने कार्बन फूटप्रिंट कॅल्क्युलेटरच्या आधारे ही समस्या कमी करण्यासाठी खेळणी, काही कपडे किंवा पुस्तकं पुन्हा वापरणं किती गरजेचं आहे, हे दाखवलं.

Sharingmitra.org या चॅरिटी स्टार्ट-अपसाठी 2.40 लाख किलो कार्बन फूटप्रिंट मिटवले गेले, असे दोन्ही भावांकडून सांगण्यात येते. गेल्या उन्हाळ्यात, आम्ही अमरावती येथे एका शिबिरात गेलो होतो आणि झोपडपट्टीतील मुलांशी संवाद साधण्याची संधी मिळाली होती आणि त्यांची परिस्थिती पाहून आमचे मन हलले. आम्ही परत आलो आणि इंटरनेटवर संशोधन केले की भारतात 10 कोटी आणि जगभरात 150 कोटी मुले आहेत अशी माहिती अबीर रामकृष्णन यांनी दिली.

त्यांनतर या दोन्ही भावांनी ओपन कोड प्लॅटफॉर्म वापरून वेबसाइट तयार केली. त्यांच्या मॉडेल अंतर्गत, देणगीदारांकडून घेतलेल्या वस्तू गरीब मुलांना पाठवल्या जातात. त्यापैकी बहुतेक कपडे किंवा खेळण्यांसारख्या गोष्टी आहेत. शक्यतो पालिका शाळेतील मुलांना फायदा देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

दान केलेल्या वस्तूंच्या वितरणासाठी Zomato किंवा Swiggy सारख्या कंपन्यांना गुंतवून ठेवण्याची त्यांची योजना आहे. सध्या, आम्ही लोकलवर काम करत असून देणगीदार आणि स्वीकारणारे दोघेही नागपूरपुरते मर्यादित आहेत, परंतु आम्ही इतर शहरांमध्येही विस्तार करण्याची योजना आखत आहोत असे त्यांनी सांगितलं.

त्यांनतर आपल्या दुसऱ्या उपक्रमाबाबत सांगताना अनयने म्हंटल कि, आम्ही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून लोकांना अमर करण्याची योजना आखत आहोत. व्हर्च्युअल होलोग्राम तयार करण्याची योजना आहे जी तुमच्या डिव्हाइसमधून पॉप आउट होऊ शकते. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने होलोग्राम इंटरनेटवर सर्च करून बोलू शकतात आणि आवाजाला प्रतिसाद देऊ शकतात. “आपल्याला अॅपद्वारे महात्मा गांधी आणि अल्बर्ट आइनस्टाईन सारखी व्यक्तिमत्त्वे मिळू शकतात. तुमच्या प्रियजनांना जिवंत करण्यासाठी, प्रीमियम सेवेचे सदस्यत्व घेणे आवश्यक आहे असे ते म्हणतात. पुढील 15 महिन्यांत प्रॉडक्ट बनवण्याच्या आशेने, ते पुन्हा एकदा निधीसाठी प्रयत्न करतील. या पैशाचा उपयोग कर्मचाऱ्यांना कामावर ठेवण्यासाठी केला जाईल.