हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 8th pay Commission- केंद्रीय सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या (8th pay Commission) स्थापनेस मंजुरी दिली, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची प्रतिक्षा होती. आता, या निर्णयामुळे लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. पण या आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेमुळे वेतनात किती वाढ होईल याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. तर चला आज आपण हि वाढ कशी आणि किती होईल याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
पेन्शन व वेतनाच्या सुधारणा निश्चित –
आठव्या वेतन आयोगाच्या (8th pay Commission) स्थापनेसह निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याची अपेक्षा आहे. सध्या, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना ७व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन व पेन्शन मिळत आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, आयोगाचे चेअरमन आणि दोन सदस्यांची नियुक्ती केली जाईल आणि त्यानंतर पेन्शन व वेतनाच्या सुधारणा निश्चित केल्या जातील.
फिटमेंट फॅक्टरचा महत्त्वपूर्ण रोल (8th pay Commission) –
वेतन आयोगाच्या शिफारशींमध्ये फिटमेंट फॅक्टरचा महत्त्वपूर्ण रोल असतो, जो वेतन आणि पेन्शन निर्धारणासाठी वापरला जातो. टीमलीजचे उपाध्यक्ष कृष्णेंदू चटर्जी यांनी सांगितले की, फिटमेंट फॅक्टर 2.5 ते 2.8 दरम्यान गृहीत धरल्यास सध्या 9 हजार रुपयांची पेन्शन 22500 ते 25200 रुपयांपर्यंत वाढू शकते. तसेच, सिंघानिया अँड कंपनीच्या भागीदार रितिका नय्यर यांनी म्हटले की, आठव्या वेतन आयोगातून पेन्शनमध्ये 20 ते 30 टक्के वाढ होऊ शकते.
कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत –
फॉक्स मंडल अँड असोसिएट्स एलएलपीचे सुमित घर यांनी सांगितले की, आयोगाचा फिटमेंट फॅक्टर 2.86 मान्य केल्यास, वेतन व पेन्शनमध्ये किमान 186 टक्के वाढ होऊ शकते. एसकेव्ही लॉ ऑफीसेसचे वरिष्ठ असोसिएट भारद्वाज यांनी सांगितले की, पेन्शनमध्ये 25 ते 30 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना महत्त्वाची आर्थिक मदत होणार आहे.
हे पण वाचा : अंबानींची क्रिप्टोकरन्सीच्या क्षेत्रात एंट्री? JioCoin ची तुफान चर्चा