Saif Ali Khan Attack| बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यामुळे सिने सृष्टीमध्ये मोठी खळबळ माजली आहे. सुरुवातीला हा हल्ला चोरीच्या उद्देशाने झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र आता, सैफ अली खानची पत्नी आणि अभिनेत्री करिना कपूरने पोलिसांना दिलेल्या स्टेटमेंटमध्ये एक वेगळाच खुलासा केला आहे. यात तीने घरात शिरलेल्या व्यक्तीचा हेतू चोरी करण्याचा नव्हता, असे सांगितले आहे.
नेमके काय घडले? (Saif Ali Khan Attack)
पोलिसांना दिलेल्या जबाबात करीराने सांगितले आहे की, हल्लेखोर आक्रमकपणे घरात शिरला होता. मात्र, त्याचा उद्देश चोरीचा नव्हता. घरातील ज्वेलरी व इतर मौल्यवान वस्तू समोर असूनही आरोपीने त्यांना हात लावला नाही. खरे तर आरोपी सैफसोबत झटापट करत असताना कुटुंबातील लोकांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता. हल्लेखोर कदाचित लहान मुलगा जहांगीरवर हल्ला करण्याच्या उद्देशाने त्याच्या खोलीत गेला होता.
परंतु, याचदरम्यान सैफने हल्लेखोराला (Saif Ali Khan Attack) रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी, करिनाने संधी मिळताच लहान मुले आणि महिलांना घराच्या १२व्या मजल्यावर सुरक्षित ठिकाणी नेले. यात हल्लेखोराने सैफवर अनेकवेळा चाकूने वार केले. या हल्ल्यात सर्वात जास्त दुखापत सैफला झाली. दरम्यान, करीना कपूरने पोलिसांना दिलेल्या या माहितीमुळे तपासला वेगळे वळण मिळाले आहे.
सध्या, पोलिसांनी या प्रकरणात ४०-५० लोकांची चौकशी केली असून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अटक केलेला व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे. सध्या पोलिस या संशयिताच्या पार्श्वभूमीचा तपास करत आहेत.