8th pay commission : 8वा वेतन आयोग येतोय! सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये होणार मोठी वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

8th pay commission : केंद्र सरकारच्या सेवेत असलेल्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे! 8वा वेतन आयोग (8th Pay Commission) लवकरच लागू होणार असून, यामुळे 50 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना आणि 68 लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना (पेंशनर्स) थेट फायदा होणार आहे. केंद्र सरकारने आयोगाच्या स्थापनेस मान्यता दिली असून, याची अंमलबजावणी 2026 (8th pay commission) पासून होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कधी पासून लागू होणार 8वा वेतन आयोग?

सध्या अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नसली तरी, अनेक माध्यमांमधून मिळालेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे. काही तज्ज्ञांच्या मते, प्रशासनिक प्रक्रियेमुळे लागू करण्यास थोडा विलंब (8th pay commission) होऊ शकतो, त्यामुळे 1 एप्रिल 2026 पासूनही अंमलबजावणी होऊ शकते.

नवीन पगार कसा ठरणार? (8th pay commission)

8व्या वेतन आयोगांतर्गत पगार फिटमेंट फॅक्टर (Fitment Factor)च्या आधारावर ठरवण्यात येणार आहे.सध्या 7व्या आयोगात हा फॅक्टर 2.57 होता.
नवीन आयोगात काही अहवालांनुसार हा फॅक्टर 2.86 ते 3 दरम्यान ठरवला जाऊ शकतो. जर सरकारने 3 किंवा त्यापेक्षा जास्त फॅक्टर ठरवला, तर कर्मचाऱ्यांचा पगार मोठ्या प्रमाणात वाढू शकतो.

किती होणार पगारात वाढ?

नव्या वेतन आयोगानुसार किमान पगार: ₹51,480 पर्यंत वाढू शकतो
मासिक पगार वाढ:सरासरी ₹19,000 पर्यंत होण्याची शक्यता
पेन्शन वाढ: ₹25,740 पर्यंत होऊ शकते

ही वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या जीवनशैलीत मोठा सकारात्मक बदल घडवणारी ठरेल.

फक्त 200 रुपयांत होणार जमिनींची हिस्सेवाटप मोजणी; सरकारचा मोठा निर्णय

कोणाला होणार फायदा?

केंद्र सरकारचे 50 लाख कर्मचारी,68 लाख पेन्शनधारक,रेल्वे, संरक्षण, पोस्टल, महसूल आणि विविध मंत्रालयांतील कर्मचारी,तसेच, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्येही लक्षणीय वाढ होणार आहे

महत्त्वाचं म्हणजे दर 10 वर्षांनी एक नवीन वेतन आयोग स्थापन होतो.7वा वेतन आयोग** 1 जानेवारी 2016 पासून लागू झाला होता. त्याचा कार्यकाळ डिसेंबर 2025 ला संपणार आहे. त्यानंतर 8वा वेतन आयोग कार्यान्वित होईल. 2026 मध्ये लागू होणाऱ्या 8व्या वेतन आयोगामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावणार आहे. नवीन आयोगामुळे पगार, भत्ते आणि पेन्शन यामध्ये ऐतिहासिक वाढ होणार असून, या बातमीने सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.