अजिंक्यतारा किल्ल्यावर 92 कोटींचा केबल रोप- वे उभारण्यात येणार : छ. उदयनराजे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

केंद्राच्या निधीतुन, नगरपरिषदेच्या मार्फत अजिंक्यतारा येथील रोप-वेच्या उभारणीस सुरुवात होईल. किल्ले अजिंक्यताऱ्यावरील मंगळाईदेवी परिसर ते किल्याच्या पूर्व भागाकडील खालची मंगळाई या हवाई मार्गावर रोप-वे उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे. डबल केबलद्वारे या दोन्ही ठिकाणांचे परिसरात एकाच वेळी दोन्ही बाजुंकडून आठ आसन क्षमतेच्या दोन रोप-वे ट्रॉलीचे आगमन निगमन होणार आहे, त्याकरीता आवश्यक जागा उपलब्ध होत आहे. एकूण 92 कोटी रुपयांच्या या केबल रोप-वे चे प्रकल्पाची उभारणी केंद्राच्या निधीमधुन करण्यात येईल, अशी ग्वाही भुपृष्ठ व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी दिली असल्याची माहिती छ. खा. उदयनराजे भोसले यांनी दिली.

नवी दिल्लीत आज भुपृष्ठ वाहतुक आणि महामार्ग वाहतुक मंत्री नितिन गडकरी यांची भेट छ. उदयनराजे भोसले यांनी घेतली. यावेळई केंद्र शासनाच्या माध्यमातुन अजिंक्यतारा येथे उभारण्यात येणाऱ्या रोप- वे बाबत विस्तृत चर्चा केली. यावेळी छ. उदयनराजे भोसले म्हणाले, नवरात्रातील सर्व दिवसांत किल्यावरील मंगळाईचे दर्शनाला नेहमीच गर्दी होत असते. परगांवचे अनेक पर्यटक अजिंक्यतारा किल्यास भेट देण्यास उत्सुक असतात. किल्याच्या दरवाजापासून थोडीशी चढण आणि पायऱ्या असल्याने वयस्कर नागरीकांना आजही किल्यावर जाता येत नाही. केबल रोप वे मुळे या सर्वांना कमी वेळेत आणि कमी श्रमामध्ये किल्यावर जाता व येता येणार आहे.

इतिहास तज्ज्ञांशी विचार करुन या किल्यावर ऐतिहासिक पर्यटन सुरु करण्याच्या कार्याला रोप-वे मुळे मदत व गती मिळणार आहे. सातारा जिल्ह्यात पर्यटनास मोठा वाव असलेला जिल्हा म्हणून ओळखला जात आहे. मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या सातारा शहरातील किल्ले अजिंक्यतारा या किल्यावर रोप-वे ची उभारणी केंद्राच्या निधीमधुन करण्यात येईल त्याबाबतची कार्यवाही लवकरच आपणास अवगत केली जाईल अशी ग्वाही देखिल ना. नितिन गडकरी यांनी दिली असल्याचे छ. उदयनराजे भोसले यांनी सांगितले.