ऊसाच्या मोळ्याखाली सापडून 12 वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | धकटवाडी गावाच्या हद्दीत ऊसाने भरलेली ट्रॅक्टर- ट्राँली पलटी होऊन ऊस मोळ्या अंगावर पडल्याने सजनी अमर काळे (वय- 12) हिचा मृत्यू झाला. सदर घटनेची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाली आहे.

याबाबत पोलीस सुत्रांकडून समजलेली माहिती अशी की, मंगळवार सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास गायत्री लकी शिंदे, झिंगाट साजन शिंदे व सजनी अमर काळे हे उपजिवेकेसाठी भाकरी घेऊन तिघे रस्त्याने जात होते. यावेळी त्या तिघी धकटवाडी हद्दीमध्ये आले असतानाच ऊसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली क्रमांक (एम.एच. 10 – एवाय- 8479) भरधाव वेगात वेडीवाकडी वळणे घेत आलेला दिसल्याने बाजूला जाण्याचा प्रयत्न केला असता, ट्राँलीमधील ऊस मोळ्या अंगावर पडल्याने सजनी अमर काळे ही अडकून पडली. तेथील रस्त्यावरून येणार्‍या- जाणार्‍या लोकांनी ऊसाच्या मोळ्या काढून ऊसाच्या खाली अडकून पडलेल्या जखमी सजनी काळे हिला वडूज ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता उपचारापूर्वीच ती मृत्यू पावल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

सदर अपघाताची माहिती मिळताच सपोनि मालोजीराव देशमुख व पोलिस कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. सदर घटनेची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाली असून ट्रॅक्टर चालक चौडाप्पा प्रभू पूजारी (वय-39, इंडी ता. विजापूर, कर्नाटक राज्य) याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. सदर घटनेचा अधिक तपास पोलिस हवालदार शांतीलाल ओंबासे करीत आहेत.