मुंबई-पुणे मिसिंग लिंक संदर्भात मोठी अपडेट ! खंडाळा घाटात उभा राहिला 180 मीटर उंच स्टेड पुल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या राज्यातील शहरांना एकमेकांशी जोडण्यासाठी सरकारचे रस्ते प्रकल्पाच्या माध्यमातून अतोनात प्रयत्न सुरू आहेत. यातीलच महत्त्वाचा घटक म्हणजे मुंबई – पुण्याला जोडला जाणारा मिसिंग लिंक. आता या मिसिंग लिंकचे काम लवकरच पूर्णत्वाच्या मार्गावर आले आहे. मात्र त्याच्या आधी एक मोठी अपडेट या मार्गाबाबत आलेली आहे. या प्रकल्पांतर्गत खंडाळा घाटात स्टेड पूल उभा राहिलाय. या पुलाचं 90% काम आता पूर्ण झालं असून लवकरच हा प्रकल्प प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मार्गामुळे मुंबई ते पुणे हे अंतर सहा किलोमीटरने कमी होणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा अर्धा तास वाचणार आहे.

सध्याच्या घडीला पाहायला गेले तर मुंबई ते पुणे या मार्गावर प्रवाशांची संख्या जास्त असते. रहदारी ही जास्त असते. त्यामुळे बऱ्याचदा या मार्गावर लोणावळा घाटात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. जर हा प्रकल्प पूर्ण झाला तर लोणावळा घाटातील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार आहे. हा प्रकल्प कधीपर्यंत पूर्ण होणार ? असा सवाल तुमच्या डोक्यात आला असेल तर हा प्रकल्प डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे एम एस आर डी सी चे नियोजन आहे. खोपोली एक्झिट पासून ते लोणावळ्याच्या कुसगाव पर्यंत दोन्ही दिशेने प्रत्येकी चार मार्गिकांचे दोन बोगदे उभारण्यात येत आहेत. यातला सर्वात मोठ्या बोगद्याची लांबी ही 8.87 किलोमीटर आहे. तर दुसरा बोगदा 1.67 किलोमीटर आहे. या दोन्ही बोगद्यांचा 98% काम पूर्ण झालय. खंडाळा खोऱ्यात सुमारे 180 मीटर उंच केबल स्टेड पुलाच्या बांधकामाला पावसाळ्यामुळे अडचणी आल्या होत्या. मात्र आता पावसाळा संपत आल्यामुळे या कामाने वेग धरला आहे

मिसिंगलिंग च्या बाबतीत सांगायचं झालं तर मिसिंग लिंक हा मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांमध्ये करेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहे. या प्रकल्पाचे अंतिम मुदत ही मार्च 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र मिसिंग लिंक पूर्णत्वाच्या जवळ आहे. मिसिंग लिंकच्या खंडाळा येथील केबल स्टेड पुलाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. 2024 ला हा प्रकल्प प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार होता मात्र मार्च 2025 पर्यंत मिसिंग लिंक खुला केला जाऊ शकतो.