Wednesday, October 5, 2022

Buy now

अवसरी येथे 22 वर्षे युवक तलावात बुडाला

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

पाटण तालुक्यातील अवसरी येथे जनावरे धुण्यासाठी घेऊन गेलेला बावीस वर्षीय युवक बुडाल्याची घटना घडली आहे. दत्ता रघुनाथ शिर्के (रा. अवसरी, या. पाटण) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पाटण तालुक्यातील अवसरी येथील दत्ता शिर्के हा युवक जनावरे करण्यासाठी घेऊन गेला होता. त्यानंतर जनावरे धुण्यासाठी पाझर तलावाजवळ त्याने नेली होती. यावेळी त्याचा पाय घसरून तो पाण्यात बुडाला. याबाबतची माहिती ग्रामस्थांना मिळतात ग्रामस्थांनी तलावाकडे धाव घेतली.

ग्रामस्थांनी दत्ता याचा शोध घेतला मात्र, अद्याप त्यांचा शोध लागला नाही. सदरची दुर्दैवी घटना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. गणेशोत्सवाच्या काळात घडलेल्या घटनेमुळे अवसरी गावावरती दुःखाचा शोककळा पसरले आहे. काल दुपारपासून सायंकाळपर्यंत दत्ता शिर्के यांचा शोध घेण्यात आला. परंतु अंधार झाल्याने शोध कार्यात अडचण येत असल्याने शोधकार्य थांबवण्यात आले. घटनास्थळी पाटण प्रशासन यंत्रणा यांनी भेट दिली आहे. अवसरी येथे युवकाचा शोध कार्यासाठी अद्याप कोणतीही यंत्रणा मदतीसाठी पोहोचलेली नाही.