व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

खळबळजनक! 60 वर्षीय व्यक्तीकडून 5 वर्षीय मुलीवर बलात्कार; भीतीपोटी आरोपीने केली आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका 60 वर्षीय व्यक्तीने पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला आहे. मुख्य म्हणजे, बलात्कार केल्यानंतर भितीपोटी संबंधित आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी घडलेल्या घटनेच्या तपासाला सुरुवात केली आहे.

उत्तर प्रदेच्या बरेली जिल्ह्यातील फरीदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी घराबाहेर खेळत असताना अचानक ती गायब झाली होती. बराच वेळ ती घरी परतली नसल्यामुळे कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. यावेळेसच पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी आरोपीला मुलीवर जबरदस्ती करताना पाहिले. त्यामुळे आरोपीने तेथून पळ काढला. यानंतर, मुलीला रक्ताने माखलेली पाहिल्यानंतर कुटुंबाने तिला त्वरित रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

पुढे घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती पीडित मुलीकडून मिळाल्यानंतर कुटुंबीयांनी आरोपीच्या विरोधात जवळील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी आरोपीच्या विरोधात बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याचे समजतात आरोपीने झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपवले. ज्यावेळी पोलीस आरोपीला अटक करण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांना आरोपीचा मृतदेह आढळून आला. यातून त्यांच्या लक्षात आले की, आरोपीने भीतीने किंवा पश्चात्तापाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सध्या या सर्व घटनेचा तपास पोलीसांकडून सुरू आहे.