Monday, February 6, 2023

6 वर्षाच्या चिमुकल्याचा शिक्षिकेवर बंदुकीतून गोळीबार

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एका सहा वर्षाच्या चिमुकल्याने थेट शिक्षिकेवरच बंदुकीतून गोळी झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित घटना हि अमेरिकेतील व्हर्जिनियामध्ये घडली असून या घटनेमुळे एकच गलबल उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी अमेरिकेमधील व्हर्जिनियामध्ये एका प्राथमिक शाळेत शिक्षिका आपल्या विद्यार्थ्याना शिकवत होती. यावेळी वर्गात बसलेल्या सहा वर्षाच्या विद्यार्थ्याने अचानक बंदूक काढली गोळी झाडण्यास सुरुवात केली. यामध्ये शिक्षिका गंभीर जखमी झाली आहे. घटना घडल्यानंतर तात्काळ शिक्षिकेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. शिक्षिकेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisement -

याप्रकरणी पोलिसांनी एका विद्यार्थ्याला ताब्यात घेतले असून या विद्यार्थ्याचे वय किती आहे हे अधिकाऱ्यांनी सांगितले नसले तरी गोळीबार करणारा विद्यार्थी केवळ 6 वर्षांचा असल्याचे सांगण्यात आले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना आपापल्या पालकांसोबत घरी सोडण्यात आले आहे. ही गोळीबाराची घटना घडलेल्या न्यूपोर्ट न्यूज शहराची लोकसंख्या 1 लाख 85 हजारांपेक्षा जास्त आहे. हे शहर चेसापीक आणि व्हर्जिनिया बीचपासून 40 मैलांवर आहे. हे शहर यूएस नेव्हीसाठी जहाजबांधणीमुळेही ओळखले होते.