माण तालुक्यात 65 वर्षीय महिलेला रात्रीचे ओढत नेवून बलात्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
माण तालुक्यात एका गावात 65 वर्षीय महिलेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. या प्रकारामुळे माण तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आबा बाबा पवार (रा. मार्डी, ता. माण) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रात्री 11. 30 वाजण्याच्या सुमारास 65 वर्षीय पिडित महिला ही लघुशंकेसाठी बाहेर आली होती. यावेळी संशयित आरोपी आबा पवार याने पाठीमागून येऊन महिलेस मिठी मारली. आरोपीने तोंड दाबून घराच्या मागे अंधारात ओढत नेत तोंडावर लाथा-बुक्क्याने मारहाण केली. तसेच हातातील चाकूने दोन्ही हातावर मारत फिर्यादी महिलेस खाली पाडून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

फिर्यादीच्या तक्रारीवरून दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी सदर आरोपीस अटक केली आहे. अधिक तपास दहिवडी पोलीस ठाण्याचे सपोनि अक्षय सोनवणे करत आहेत.