खेळता खेळता 9 वर्षाच्या चिमुकलीचा गळफास लागून मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ओंनलाईन । घरामध्ये लोखंडी पाइपला साडी बांधून झोका खेळत असताना नऊ वर्षांच्या चिमुकलीचा गळफास लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना खटाव तालुक्यातील तडवळे येथे रविवारी घडली आहे.

पोर्णिमा शंकर फाळके (वय 9, रा. तडवळे, ता. खटाव) असे मृत चिमुकलीचे नाव असून या घटनेने खटाव तालुक्यासह तडवळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नऊ वर्षाची चिमुकली पोर्णिमा ही तिच्या घरामध्ये झोका खेळत होती. तिने लोखंडी पाइपला साडी बांधली होती. या साडीमध्ये बसून ती झोका खेळतअसताना अचानक तिची मान साडीमध्ये अडकली. आणि तिच्या गळ्याला फास लागला. तिने आरडाओरड केल्यानंतर हा प्रकार घरातल्यांच्या निदर्शनास आला. यानंतर घरातील लोकांनी तिच्या मानेचा फास सोडवून तिला तातडीने वडूज येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने तडवळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शंकर पोपट फाळके (वय 40, रा. तडवळे, ता. खटाव, जि. सातारा) यांनी वडूज पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेचा अधिक तपास महिला पोलिस हवालदार एस. एल. वाघमारे करीत आहेत.