चक्क एका भिकाऱ्याने खरेदी केला iPhone 15, लाखोंची चिल्लर दिली दुकानदाराला; Video Viral

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या iPhone 15 संदर्भात एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या व्हिडिओत एक भिकारी व्यक्ती आयफोन खरेदी करताना दिसत आहे. सुरुवातीला कोणालाही विश्वास बसत नाही की हा व्यक्ती आयफोन खरेदी करण्यासाठी दुकानात आला आहे. मात्र ज्यावेळी तो, आपल्या जवळ असणाऱ्या पोत्यातून गोळा केलेली चिल्लर बाहेर काढतो तेव्हा सर्वांनाच धक्का बसतो. हा भिकारी आपल्या जवळची सगळी चिल्लर दुकानदाराला देऊन नवीन आयफोन खरेदी करतो. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओला लोकांकडून पसंती देखील मिळत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत आपल्याला दिसते की, एक भिकारी व्यक्ती आयफोनच्या दुकानात जातो. यानंतर तो आपल्याला आयफोन खरेदी करायचा आहे हे देखील दुकानदाराला सांगतो. सुरुवातीला त्याच्या या गोष्टीवर कोणाच विश्वास ठेवत नाही. मात्र त्यानंतर हा भिकारी आपल्याजवळ असणाऱ्या पोत्यातून नाण्यांची चिल्लर बाहेर काढतो. ही चिल्लर तो दुकानदाराला देऊन नवीन आयफोन खरेदी करतो. ही चिल्लर मोजत असताना दुकानदाराच्या नाकी नऊ येतात.

खरे सांगायला गेले तर, इंस्टाग्राम अकाउंट एक्सपेरिमेंट किंगने iPhone 15 खरेदी संदर्भात केलेला हा एक सामाजिक प्रयोग होता. या प्रयोगालाच सोशल मीडियावर पसंती मिळत आहे. अनेकांनी या व्हिडिओला आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केले आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 41 M+ व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, 2.9 M+ वेळा शेअर करण्यात आले आहे. काहींनी तर, “एका भिकाऱ्याने ठरवल तर तो देखील आयफोन खरेदी करू शकतो” अशा देखील प्रतिक्रिया या व्हिडिओवर दिल्या आहेत.