हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सोशल मीडिया ॲपच्या (Social Media Apps) माध्यमातून ऑनलाईन स्कॅम (Online Scam) करणाऱ्या लोकांची संख्या वाढत चालली आहे. आता फेसबुकबरोबर इन्स्टाग्रामवरील स्कॅमला देखील सुरूवात झाली आहे. काहीच हॅकर्स इंस्टाग्राम अकाउंट हॅक (Instagram Account Hack) करत आहेत. तसेच तुमच्या अकाउंटवरून दुसऱ्या व्यक्तींना पैशाची मागणी करत आहेत. त्यामुळे अशा हॅकर्सपासून वाचण्याची आणि सतर्क राहण्याची आपल्याला सर्वात जास्त आवश्यकता आहे. या स्कॅमपासून तुम्हाला वाचायचे असेल तर पुढील टीप्स नक्की फॉलो करा.
कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका- इंस्टाग्राम अकाउंटवर तुम्हाला कोणत्याही अनोळखी व्यक्तीने नवीन लिंक किंवा मेसेज पाठवला तर त्यावर क्लिक करू नका. या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्या खात्यातून देखील पैसे जाऊ शकतात.
डिटेल्स शेअर करू नका – काही स्कॅमर्स वेगवेगळ्या कारणांसाठी तुमची माहिती मागवू शकतात. परंतु अशा अनोळख्या व्यक्तींना तुमची माहिती पासवर्ड, बँकेचा अकाउंट नंबर देऊ नका.
अधिकृत वेबसाईटचा वापरा – तुम्ही तुमचे इंस्टाग्राम अकाउंट ब्राउझर किंवा कोणत्याही दुसऱ्या माध्यमातून उघडू नका. शक्यतो इंस्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवरून किंवा इंस्टाग्राम ॲपवरून तुम्ही तुमच्या अकाउंट उघडा.
स्ट्रॉंग पासवर्ड टाका – तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटचा पासवर्ड स्ट्रॉंग टाका. पासवर्ड टाकताना तो आठ अंकी असावा. यामध्ये 1 मोठे लेटर, 1 छोटे लेटर, 1 संख्या, 1 विशेष लेटर वापरा.
अकाऊंट हॅक झाल्यावर काय करावे?
तुमचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाले तर इन्स्टाग्राम सपोर्ट टीमशी संपर्क साधा. तसेच तुमच्या कुटुंबांला आणि मित्रांना अकाउंट हॅक झाल्याची माहिती द्या.