बिहारमध्ये उभारण्यात येणार राम मंदिरापेक्षाही भव्य मंदिर; जगातील सर्वात मोठे शिवलिंग असेल येथे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम यांचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. येत्या 22 जानेवारी रोजी या मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. परंतु आता राम मंदिराला देखील मागे सारेल असे भव्य मंदिर बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यात बांधले जात आहे. हे मंदिर राम मंदिरापेक्षा देखील सर्वात मोठे असेल असे म्हटले जात आहे. या मंदिराचे नाव विराट रामायण मंदिर आहे.

येत्या 2025 साली हे विराट रामायण मंदिर बादल पूर्ण होण्याची शक्यता आहे. या विराट रामायन मंदिरात जगामधील सर्वात मोठे शिवलिंग बांधण्यात येणार आहे. सध्या हे मंदिर उभारण्याचे काम जलद गतीने सुरू आहे. मोतिहारी म्हणजेच कैथवालिया येथे बांधले जाणारे विराट रामायण मंदिर बांधण्यास 2012 साली सुरूवात करण्यात आली होती. मात्र अद्याप या मंदिराचे बांधकाम पूर्ण झालेले नाही.

विराट रामायण मंदिर पाटणाच्या महावीर मंदिराचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले त्यावेळी भाजपचे तत्कालीन आमदार सचिंद्र सिंह उपस्थित राहिले होते. महत्वाचे म्हणजे, या मंदिराचे एकूण क्षेत्रफळ 125 एकर आहे. तसेच, क्षेत्रफळ 3.67 लाख चौरस फूट आहे. मंदिराचे शिखर 270 फूट आहे. या मंदिराची लांबी 1080 एवढी आहे. तर रुंदी 540 फूट आहे.

खास वैशिष्ट्ये

विराट रामायण मंदिर तीन मजली बांधण्यात येणार आहे. विराट रामायण मंदिरात 22 मंदिरे बांधण्यात येणार आहेत. या मंदिर परिसरात जगातील सर्वात मोठ्या शिवलिंगाची स्थापना करण्यात येणार आहे. मंदिराचे क्षेत्रफळ 3.67 लाख चौरस फूट आणि सर्वोच्च शिखर 270 फूट असेल. तर 180 फूट उंचीची चार शिखरे असतील. यात 135 फूट उंचीचे एक शिखर आणि 108 फूट उंचीचे 5 शिखर असतील. 2024 मध्ये अयोध्येत राम मंदिर बांधल्यानंतर विराट रामायण मंदिराचे बांधकाम 2025 मध्ये पूर्ण होईल.

राम मंदिर

देशातील सर्वात मोठे मंदिर म्हणून राम मंदिराला पाहिले जात आहे. या मंदिराचा लोकार्पण सोहळा 22 जानेवारी रोजी होणार आहे. या मंदिराचे अद्याप काम पूर्ण झालेले नाही. मात्र पुढील काही दिवसातच मंदिर पूर्णपणे बांधून झालेले असेल. या मंदिरासाठी देखील कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले आहेत.