मोठी बातमी! RBI बँकेला धमकीचा मेल; मुंबईत 11 ठिकाणी बॉम्ब ठेवण्याचा दावा, ही केली प्रमुख मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज मुंबईतील भारतीय रिझर्व्ह बँकेला ई-मेलच्या माध्यमातून धमकी देण्यात आली आहे. खिलाफत इंडिया नावाच्या ई-मेल आयडीवरुन आरबीआय कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी दिल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. इतकेच नव्हे तर, HDFC आणि ICC बँकेत देखील बॉम्ब ठेवल्याची धमकी ईमेलद्वारे मिळाली आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांकडून या सर्व प्रकरणाचा तपास सुरू आहे.

निर्मला सीतारमण यांनी राजीनामा द्यावा

“आज दुपारी दीड वाजता मुंबईतील ११ ठिकाणी बॉम्बस्फोट होतील. आम्ही मुंबईतील 11 ठिकाणी हे बॉम्ब ठेवले आहेत”, अशी धमकी खिलाफत इंडिया नावाच्या ई-मेल आयडीवरुन देण्यात आली होती. ही धमकी थेट आरबीआयच्या ई -मेल आयडीवर पाठवण्यात आली होती. धमकीदाराने या ईमेलच्या माध्यमातून काही मागण्या देखील ठेवल्या होत्या. ज्यात, “गव्हर्नर आणि निर्मला सीतारमण यांनी तात्काळ राजीनामा द्यावा” अशी प्रमुख मागणी होती. तसेच, त्यांनी राजीनामा न दिल्यास, मुंबईतील 11 ठिकाणी बॉम्बस्फोट करण्यात येतील असे धमकीदाराने ई-मेलमध्ये म्हटले होते.

संबंधित धमकीदाराने धमकीचा मेल आरबीआयच्या ईमेल आयडीवर पाठवला होता. त्यामुळे ही धमकी मिळताच, ज्या ज्या ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचा दावा धमकीदाराने केला आहे, त्या ठिकाणी तातडीने शोध मोहीम राबवण्यात आली. परंतु या शोध मोहिमेत पोलिसांच्या हाती कोणतेही आक्षेपार्ह गोष्ट आढळली नाही. अद्याप हा मेल कोणी पाठवला? त्याचा नेमका हेतू काय होत आहे? हे समोर आलेले नाही. सध्या या सर्व प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.