घरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपलं घर साफ आणि वाटत असते. मात्र साफसफाई करीत असताना सगळ्यात अवघड वाटणारी खोली म्हणजे किचन किचन साफ करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. त्यातही किचनमधील एक्झॉस्ट फॅन साफ करायचा म्हणजे विचारूच नका. चिवट, तेलकट, चिकट एक्झॉस्ट फॅन साफ करणे म्हणजे कोणत्या टास्क पेक्षा कमी नाही. म्हणूनच आजच्या लेखात आम्ही काही एक्झॉस्ट फॅन साफ करण्याचे फंडे सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा वेळ आणि मेहनत नक्कीच वाचू शकेल. चला तर मग जाणून घेऊया…
गरम पाणी आणि डिशवॉश लिक्विड
एक भांडे गरम पाण्याने भरा.
त्यात 2-3 चमचे डिशवॉश लिक्विड मिसळा.
फॅनचे ब्लेड आणि कव्हर यामध्ये 15-20 मिनिटे भिजवा.
ब्रशने स्वच्छ करून कोरड्या कापडाने पुसा.
बेकिंग सोडा आणि व्हिनेगर (सिरका)
एका भांड्यात गरम पाणी, 2 चमचे बेकिंग सोडा आणि 1 कप व्हिनेगर मिसळा.
फॅनचे भाग या मिश्रणात भिजवा आणि नंतर ब्रशने स्वच्छ करा.
नंतर कोरड्या कापडाने पुसून घ्या.
अमोनिया सोल्यूशन
एका बादलीत पाणी आणि थोडेसे अमोनिया मिसळा.
या द्रावणाने फॅनच्या ब्लेड्स आणि कव्हर पुसा.
त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन कोरडे करा. (अमोनियाचा वास टाळण्यासाठी मास्क वापरा.)
डिटर्जंट आणि गरम पाणी
गरम पाण्यात डिटर्जंट टाका आणि फेस येऊ द्या.
या द्रावणात फॅनच्या भागांना भिजवा आणि स्क्रब करा.
पाण्याने स्वच्छ धुवून सुकवा.
डिझेल किंवा केरोसीन तेल
एक स्वच्छ कापड घ्या आणि त्यावर थोडेसे डिझेल किंवा केरोसीन तेल टाका.
चिकटलेले तेल सहज निघून जाईल.
त्यानंतर साबणाच्या पाण्याने धुवून स्वच्छ करा.
एक्झॉस्ट फॅन नियमित स्वच्छ राहण्यासाठी उपाय
दर आठवड्याला हलका कपड्याने पुसा – त्यामुळे जाड चिकट थर साठणार नाही.
ब्लेडवर साबणाचा पातळ थर लावा – त्यामुळे चिकट मळ सहज निघेल.
फॅनजवळ हळद, मीठ आणि सोडा यांचा वापर करा – हे घटक तेलकट थर कमी करतात.
फॅनच्या भोवती पातळ प्लास्टिक फिल्म लावा – दर महिन्याला बदलल्यास फॅन स्वच्छ राहतो.
फॅन जास्त वेळ बंद ठेवू नका – नियमित वापरामुळे त्यावर तेल साठत नाही.
स्वच्छता नियमितपणे केल्यास एक्झॉस्ट फॅन तेलकट आणि चिकट होणार नाही. घरगुती उपायांनी वेळ आणि पैसे वाचतील आणि स्वयंपाकघर स्वच्छ राहील.




