Satara News : महाबळेश्वरमध्ये सेल्फी घेताना 300 फूट दरीत कोसळून महिला पर्यटकाचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पर्यटनस्थळी गेल्यावर तेथील पर्यटनस्थळासोबत सेल्फी घेण्याच्या प्रत्येकाला मोह आवरता येत नाही. मात्र, या मोहापायी जीव जाण्याचीही शक्यता असते. अशीच सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये आज मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. महाबळेश्वर मधील एक धबधब्यानजीक सेल्फी घेताना ३०० फूट दरीत कोसळून एका महिला पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. मृत महिला पुणे येथील असल्याची माहिती मिळाली.

अकिंता सुनिल शिरसकर (वय २३) असे दरीत पडून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून तीनशे फूट खोल दरीत महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. दरम्यान, सह्याद्री ट्रेकर्सच्या रेस्क्यू टीमने संबंधित महिलेचा मृतदेह दरीत बाहेर काढला आहे.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/3367949963444471

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मृत महिला अकिंता पतीसोबत पुण्याहून महाबळेश्वरला पर्यटनाला आली होती. दोघेजण महाबळेश्वरमध्ये आल्यानंतर दुचाकीवरुन येथील अनेक पर्यटनस्थळांना भेट देत होते. मंगळवारी देखील त्यांनी अनेक पर्यटनस्थळांना भेटी दिल्यानंतर दुपारच्या सुमारास केट्स पॅाईंट परिसरातील नीडल होल पॉईंट पर्यटक महिला सेल्फी घेण्यासाठी गेली. यावेळी अचानक तिचा गवतावरून तोल गेला. काही कळणार इतक्यात ती खोल ३०० फूट दरीत कोसळली. दोनशे ते तीनशे फूट खोल दरीत कोसळल्याने तीचा मृत्यू जागीच झाला. घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर व सह्याद्री ट्रेकर्सची टीम घटनास्थळी पोहचली. यानंतर बचावकार्यास सुरुवात झाली. दोनशे ते तीनशे फूट खोल दरीत महिलेचा मृतदेह आढळला.