शॉर्टसर्किटमुळे विद्यापीठाला लागली भीषण आग; 14 जणांचा मृत्यू तर 18 जण गंभीर जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| इराकमधील इरबिल येथे असणाऱ्या विद्यापीठाच्या वसतिगृहाला आग लागल्याची भीषण घटना घडली आहे. या घटनेमध्ये तब्बल 14 जणांचा मृत्यू झाला आहे तर 18 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळच्या वेळी घडल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. सध्या इराक पोलीस ही आग कशी लागली याचा तपास करीत आहे. परंतु, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, इरबिलच्या पूर्वेकडील सोरन येथील एका इमारतीला ही आग लागली होती. या आगीमुळे परिसरात देखील गोंधळ उडाला त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी येऊन या आगीवर नियंत्रण मिळवले. तसेच इमारतीमध्ये अडकलेल्या सर्व व्यक्तींना सुखरूपरीत्या बाहेर काढले. मात्र काही जणांना गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्व घटनेवर इराकचे पंतप्रधान मसरूर बरजानी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच पीडित कुटुंबाप्रती सहानुभूती व्यक्त करत आम्ही या घटनेचा खोलवर तपास करू असे देखील म्हटले आहे.

दरम्यान, इराकी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ही आग विझवण्यास अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले आहे. सध्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या विद्यापीठाच्या इमारतीला ही आग लागली होती ते विद्यापीठ कुर्दिस्तानमधील आहे. त्यामुळे कुर्दिस्तान इंतेजामियाने या प्रकरणी एक समिती स्थापन केली आहे जी या घटनेची चौकशी करेल.