Sunday, May 28, 2023

काय म्हणावं याला… गारुड्याची पुंगी वाजताच त्यानं काढला फणा ! डसण्यासाठी थेट धावला अंगावर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हल्ली सोशल मीडियावर काहीही गोष्टी पडतात. मात्र, त्या इतक्या मनोरंजक असतात कि त्याला तोडच नाही. सध्या एका दारुड्याच्या नागिन डान्सचा भन्नाट व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. गारुड्याने पुंगी वाजवल्यावर एका दुकानात असलेला दारुड्या नागासारखा फणा काढून बाहेर येतो. हा पठ्ठ्या नशेत टुल्ल होऊन गारुड्याच्या अंगावर येतो आणि नागासारखा फणा मारण्याचा प्रयत्न करतो. हा सर्व मजेशीर प्रकार कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालेल्या या व्हिडिओची चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. या व्हिडीओत एक गारुडी पुंगी वाचवताना दिसत आहे. पुंगीच्या तालावर दुकानात असलेला एक व्यक्ती नागासारखा फणा काढून भन्नाट डान्स करताना दिसत आहे. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओला नेटकऱ्यांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत असून व्हिडीओ शेअरही केला जात आहे.

दारुड्याचा भन्नाट डान्स पाहून नेटकऱ्यांचं मनोरंजन तर झालंच आहेच, याशिवाय नेटकरीही या व्हिडीओवर प्रतिक्रियांचा वर्षाव करत आहेत. इंटरनेटवर प्रकाशझोतात येण्यासाठी कोण काय करील याचा नेम राहिला नाही. कारण गारुड्याच्या पुंगीवर फणा काढून भन्नाट डान्स करून लोकांना पोट धरून हसवणाऱ्या या पठ्ठ्यानंही कमालच केली आहे.