विठ्ठलाच्या दर्शनाला निघालेल्या पती- पत्नी अपघातात जागीच ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पंढरपूर | उपरी (ता. पंढरपूर) येथे विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी निघालेल्या सातारा तालुक्यातील पती-पत्नीचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. कार आणि बाईकमध्ये जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला. विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरकडे जाताना पती-पत्नीवर काळाने घाला घातला आहे. कार आणि मोटरसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली.

या भीषण अपघातामध्ये मोटारसायकलवरील प्रकाश दादा भुजबळ व लक्ष्मी प्रकाश भुजबळ (रा. शेनवडी, ता. खटाव, जि. सातारा) असे जागीच ठार झालेल्या पती-पत्नीचे नाव आहे. हा अपघात इतका भीषण होता की मोटारसायकलचे दोन तुकडे झाले आहेत‌. तर चारचाकी पलटी झाली.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी‌ उपचासाठी भुजबळ दाम्पत्याला रूग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला. या प्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.