मागच्या काही दिवसांमध्ये ट्रेन अपघातांच्या संख्येत लक्षणीय रित्या वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. रेलवे अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारने रेल्वे ट्रॅक वर कवच प्रणाली बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मोहिमेअंतर्गत देशात पहिल्यांदाच एका मार्गावर ही कवच प्रणाली बसवण्यात आली आहे. चला जाणून घेऊया…
देशातील पहिला कवच ट्रॅक
सवाई माधवपूर आणि कोटा दरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवर आता अपघात रोखणारे कवच नियंत्रण बसवण्यात आले आहे. रेल्वेने येथील स्वयंचलित ट्रेन सुरक्षा प्रणाली म्हणजेच ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन सिस्टीम कवच 4.O स्थापित केल्याने असे कवच लावलेला रेल्वेचा हा देशातील पहिलाच ट्रॅक ठरलाय.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन 4.O प्रणालीची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव स्वतः चाचणी घेणार आहेत. यासाठी रेल्वेमंत्री आज मंगळवारी सवाई माधवपुर ते समीर गंज मंडी असा प्रवास करणार आहेत. 4.O ही पूर्णपणे अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा आहे जी रेल्वे अपघात रोखण्यासाठी जीवन रक्षक ठरणार आहे. ट्रेनच्या सुरक्षित संचलनासाठीही याचा उपयोग होईल 108 किलोमीटर अंतरावर ही सुरक्षा यंत्रणा बसवण्यात आली आहे.
या प्रणालीकरिता या मार्गावर 130 टॉवर उभारण्यात आले आहेत. ऑप्टिकल फायबर केबर टाकण्यात आली आहेत . 178 सिग्नलिंग इंटरफेस आणि एस पी एल एस नेटवर्क तयार करण्यात आले4.O निर्दोष ऑपरेशनसाठी अनेक चाचण्या देखील घेण्यात आल्यात. तसेच 78 कवच भवनची निर्मिती देखील करण्यात आली आहे.
नेमके काय होणार
आता तुम्ही विचार करत असाल ट्रेनचा वेग अधिक असल्यास ट्रेन आपोआप कशी काय थांबणार? तर याचे उत्तर जाणून घेऊया… ट्रेनचा वेग निर्धारित मर्यादेपेक्षा दोन किलोमीटर प्रतितास आणि ओलांडल्यास कवच ओवर स्पीड अलार्म वाचवेल ट्रेनचा वेग तशी पाच किलोमीटर पेक्षा जास्त असेल तर आपोआप ब्रेक लावले जातील आणि तशी नऊ किलोमीटरचा वेग असेल तर इमर्जन्सी ब्रेक लावले जातील.
कवच इंटरलॉकिंग सिस्टीम मधून पुढील सिग्नल वाजेल आणि तो रेडिओ लहरीद्वारे इंजिन वर दिसेल त्यामुळे पायलेटला 160 किलोमीटर वेगाने सिग्नल वाचण्याची सोय होईल. त्याला लाईन वरील सिग्नल वर अवलंबून राहावं लागणार नाही. एवढेच नाही तर जर लोकोपायलट नेही ट्रेन चालवताना काही चूक केली तर यंत्रणा ताबडतोब अलर्ट करेल आणि आणीबाणीच्या परिस्थितीतही ब्रेक लावेल.