बंदुकीचा धाक दाखवून स्कार्पिओ कार चोरणाऱ्यास सांगलीतून अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके
बाँम्बे रेस्टॉरंट ब्रीज ते कोल्हापूरकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर एका इसमाने बंदुकीचा धाक दाखवुन महिन्द्रा कंपनीची स्कार्पिओ कार चोरून नेल्याची घटना घडली होती. याबाबत नवनाथ नामदेव भुजबळ यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. सदरची जबरी चोरी मंगळवारी (दि. 21 फेब्रुवारी) रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी आरिफ अमिन मुजावर (वय- 26, रा. ढालगाव ता. कवठेमहाकाळ जि. सांगली) ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरातील महामार्गावर असलेल्या बाँम्बे रेस्टॉरंट परिसरात महिन्द्रा कंपनीची स्कार्पिओ कार (क्र. एम. एच. 10 एयु- 1441 ही जबरदस्तीने चोरी करुन नेहली होती. सदर गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक बापू बांगर, पोलीस उपअधिक्षक गणेश किंद्रे यांनी सदर गुन्ह्यातील आरोपीचा व मुद्देमालाचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणणे बाबत सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांचे मार्गदर्शनाखाली गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी एस. बी. मोरे व डीबी पथकातील कर्मचारी यांनी संशयित आरोपीस ढालगाव (ता. कवठेमहाकांळ, जि. सांगली) येथुन एका इसमास ताब्यात घेतले.

आरोपीकडून जबरदस्तीने चोरी केलेली 3 लाख रुपये किमतीची महिन्द्रा कंपनीची कार व मोबाईल फोन सह 3 लाख 75 हजार रुपये किमतीचा मुद्देमालासह आरोपीस अटक केली आहे. सदरची कारवाई पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोलीस नाईक अविनाश चव्हाण, पंकज ढाणे, अभय सावळे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश घाडगे, गणेश भोंग, विशाल धुमाळ यांनी केली.