पुणे हादरलं! अल्पवयीन मुलीला 15 दिवस डांबून नराधमाने केला बलात्कार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पुणे शहरामध्ये (Pune) माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. एवढेच करून न थांबता त्याने या अल्पवयीन मुलीकडून वेश्याव्यवसाय देखील करून घेतला आहे. या सर्व घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. तसेच त्याच्या विरोधात पोक्सोसह आणि इतर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

असा घडला सर्व प्रकार….

समोर आलेल्या माहितीनुसार; 30 वर्षीय आरोपीने फिर्यादी दांपत्याला 30 हजार रुपये उसने दिले होते. हे पैसे पीडित मुलीच्या वडिलांच्या उपचारासाठी लागणार होते. परंतु पैशांच्या अडचणीमुळे दांपत्याला हे पैसे आरोपीला पुन्हा देता आले नाही. त्यामुळे आरोपीने सतरा वर्षीय मुलीला तब्बल 15 दिवस एका लॉजवर दाबून ठेवले. तसेच तिच्यावर वारंवार बलात्कार देखील केला. एवढे करून न थांबता आरोपीने या दांपत्याला जीवे मारण्याची देखील धमकी दिली. पुढे आरोपीने मुलीला वेश्याव्यवसायात पाठवले आणि तिच्याकडून पैसे घेतले.

पुणे शहरांमध्येच हे सर्व प्रकरण सुरू असल्यामुळे बुधवारी पोलिसांना फोन आला की, एका लॉजमध्ये अल्पवयीन मुलीला डांबून ठेवण्यात आले आहे. यानंतर पोलिसांनी तातडीने लॉजवर जाऊन मुलीची सुटका केली. तसेच तिच्या आई-वडिलांना पोलीस ठाण्यात बोलवून घेतले. पोलिसांकडून करण्यात आलेल्या चौकशीत आई-वडिलांनी घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पुढे पोलिसांनी दांपत्याने केलेल्या तक्रारीच्या आधारावर आरोपी पूनम माने आणि आकाश माने यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. आता पोलीस आरोपींची कसून चौकशी करत आहेत. तसेच, ज्या लॉजवर या मुलीला ठेवण्यात आले होते त्या लॉजच्या मालकाची चौकशी देखील करण्यात येत आहे.