हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | या जगामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या अजूनही मानवांना माहिती नाहीयेत. ज्याचा अजूनही शोध लागलेला नाही. अशा अनेक वनस्पती त्याचप्रमाणे अनेक असे प्राणी देखील आहेत. जे माणसांनी कधीच पाहिलेले नसतात. या गोष्टींपासून शास्त्रज्ञ देखील अजून लांब आहेत. आपला समुद्र तर असा आहे, ज्याबद्दल अनेक गौढ आणि पौराणिक कथा आहेत. ज्याचा संबंध आपल्या आयुष्याशी लावतात. या समुद्रात आपल्याला अनेक गोष्टींचा शोध लागतो. अशीच एका नव्या गोष्टीची माहिती या समुद्रावर मिळालेली आहे.
नुकतेच मलेशियातील एका बीचवर एक भयावह प्रकार पाहायला मिळालेला आहे. या ठिकाणी लुंडू येथील मिलो बीचवर एक विचित्र घटना घडलेली आहे. ती म्हणजे या बीचवर एका विचित्र राक्षसी प्राण्याचा मृतदेह वाहून गेलेला आहे. हा मृतदेह कुजलेला आणि फुगलेल्या स्वरूपाचा होता. समुद्रकिनाऱ्याची पाहणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी हा प्राणी पहिल्यांदाच पाहिल्याचे सांगितलेले आहे. स्थानिक आपत्ती एजन्सी सार्वक सिविल डिफेन्स फोर्स यांनी फेसबुकच्या माध्यमातून ही माहिती सगळ्यांना दिलेली आहे.
तेथील स्थानिक वृत्तपत्रांच्या माहितीनुसार या भागात किनारपट्टीवर असे समुद्री सस्तन प्राणीआढळणे खूपच दुर्मिळ गोष्ट आहे. त्यामुळे हा प्राणी पहिल्यांदा तिथे सापडल्यामुळे तेथील स्थानिक लोकांनी या प्राण्याला पाहण्यासाठी झुंबड उडवली होती. परंतु अनेक तज्ञांची असे म्हणणे आहे की, कदाचित ते व्हेल या माशाचे अवशेष असावे.
ही घटना ही ग्लोबस्टर जगभरातील समुद्रकिनाऱ्यावर सापडलेला एक रहस्यमय प्राण्यांची आठवण करून देतो. त्यापैकी एक पांढरा जलपरी सारखा प्राणी होता. जो गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये दिसला होता. लाईव्ह सायन्सने दिलेल्या माहितीनुसार त्या प्राण्याचे शरीर अत्यंत वाईट विघटित झालेले होते. त्याचप्रमाणे हा काहीसा समुद्री सस्तन प्राणी असल्याचे देखील आढळले होते.
त्याचप्रमाणे 2020 मध्ये देखील ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टीवर असाच एक दुर्मिळ आणि मोठा प्राणी लोकांना दिसला होता. या प्राण्याचे स्वरूप हे एलियनसारखे दिसत होते. ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनावर असलेल्या एका नदीच्या मुखावर हा प्राणी आढळला होता. ओशन सनफिश हे या सिंहासारख्या प्राण्याचे नाव होते. या प्राण्याचा शोध त्यात रॅम्प्टन यांनी लावला. त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत त्यांचा नवरा टॉम देखील होता. ते दोघं बीचवर एन्जॉय करण्यासाठी गेलेले होते. ते दोघेही पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत. परंतु हा प्राणी याआधी त्यांनी कधीच पाहिला नसल्याचे त्यांनी सांगितलेले आहे.