Monday, January 30, 2023

कराड शहरात विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने चालता ट्रक पेटला

- Advertisement -

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
कराड शहरातील मुजावर काॅलनी परिसरात भेदा चाैकात आज 12 वाजण्याच्या सुमारास एका ट्रकमधील साहित्य पेटले. विद्युत वाहिन्यांचा स्पर्श झाल्याने ट्रकमधील साहित्याने पेट घेतला. यामध्ये ट्रकचेही मोठे नुकसान झाले आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कराड शहरातील भेदा चाैकातून एक ट्रक चालला होता. या ट्रकमध्ये मिरची, मसाल्याचे साहित्य भरले होते. ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त माल भरल्याने विद्युत वाहिन्यांचा स्पर्श झाला. यावेळी विद्युत वाहिन्याचा चिटकल्याने मोठा आवाजही झाला. तेव्हा आवाजाने परिसरातील लोकांनी ट्रककडे धाव घेतली.

- Advertisement -

नागरिकांनी सावधानता बाळगत कराड अग्निशामक दलाला पाचारण केले. तोपर्यंत साहित्य मोठ्या प्रमाणात जळाले, तसेच ट्रकचा वरील भागही काही प्रमाणात जळाला. ट्रक व साहित्याला आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. या मार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली. तर ट्रकमधील साहित्य काढण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू आहेत.