‘पप्पी दे’ म्हणल की लगेच देतात; या दोन बैलांच्या जोडीला तब्बल 1 कोटी रुपयांची मागणी

0
1
KVK
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बारामतीत कृषी प्रदर्शन (Krushi Pradarshan) भरवण्यात आले आहे. परंतु यंदाच्या प्रदर्शनात सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे ते दोन बैल. या बैलांची नावे आहेत सोन्या आणि मोन्या. सोन्या आणि मोन्या हे बैल मालकाच्या प्रत्येक आदेशाला अतिशय शिस्तबद्धपणे प्रतिसाद देतात. “पाय जुळवा,” “पाटावर उभा राहा,” किंवा अगदी “पप्पी घ्या” असे आदेश दिल्यावर देखील हे बैल लगेच कृती करून दाखवतात. त्यामुळे यंदाच्या कृषी प्रदर्शनात या बैलांचे चांगलेच कौतुक होत आहे.

एक कोटी रुपयांची मागणी

खास म्हणजे, सोन्या आणि मोन्या या बैलांच्या जोडीला विकत घेण्यासाठी तब्बल एक कोटी रुपयांची मागणी झाली आहे. परंतु, आपण या बैलांना विकणार नाही अशी भूमिका बैलांच्या मालकाने घेतली आहे. सोन्या-मोन्याचे मालक सांगतात की, “हे बैल लहानपणी पंढरपूरच्या सांगोल्यातून आणले होते. आम्ही त्यांना मुलांप्रमाणे वाढवलं आणि शिस्त लावली. प्राण्यांना शब्द कळत नाहीत, पण त्यांना खाणाखुणा आणि सवयी लावल्या तर ते आपल्या भावना समजून घेतात.”

त्याचबरोबर, “सोन्या-मोन्या हे माझ्या कुटुंबाचा भाग आहेत. कितीही मोठी ऑफर आली तरी मी त्यांना विकणार नाही,” असे मत ठामपणे बैलांच्या मालकाने मांडले आहे. दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यंदाही बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये शेतीबरोबरच पशू-प्रदर्शनदेखील भरवण्यात आले आहे. खिल्लार गाई, बैल, घोडे, श्वान आणि मुऱ्हा जातीच्या म्हशी या प्रदर्शनाचा भाग आहेत. त्यामुळेच हे प्रदर्शन पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमत आहे.