Tuesday, February 7, 2023

अतिक्रमण हटविलेल्या परिसरात प्रतापगड पायथ्याशी शिवस्मारक उभारावे : विक्रम पावसकर

- Advertisement -

कराड | शिवप्रताप दिनी छ. शिवाजी महाराजांनी अफझल खान यांचा कोथळा बाहेर काढला होता. त्याचदिवशी हिंदुत्ववादी सरकारने थडगे परिसरातील अतिक्रमण काढले आहे. आता या परिसरात भव्य असे शिवस्मारक उभे करण्यात यावे अशी मागणी भाजप नेते व हिंदू एकता आंदोलनचे विक्रम पावसकर यांनी केली आहे.

गुरूवारी सातारा जिल्हा प्रशासनाने तगडा बंदोबस्त ठेवत गोपनीय पध्दतीने प्रतापगड पायथ्याशी असलेले अतिक्रमण हटविले. अफझलखान व सय्यद बंडा यांच्या थडगे परिसरातील अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर करण्यात आले होते. त्यानंतर हिंदू एकता समितीने व विविध हिंदुत्ववादी संघटनांनी हे उदातीकरण रोखावे अशी मागणी देखील केली होती. गेल्‍या वीस वर्षानंतर सर्व कबरीच्या अवतीभोवतीचे व कबरीवरील सर्व उदात्‍तीकरणासाठी बांधले गेलेले बांधकाम प्रशासनाने जमीनदोस्त केले.

- Advertisement -

विक्रम पावसकर म्हणाले, राज्याचे वनमंत्री सुधीर मनुगंटीवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मी अभिनंदन करतो. महाराष्ट्रातील 70 ते 80 किल्ल्यावर अतिक्रमण लांडग्यांनी केले आहे. त्यामुळे हे अतिक्रमण 100 टक्के निघाले पाहिजे, अशी इच्छा प्रत्येक शिवभक्तांची आहे. आमची ही इच्छा हिदुत्वादी सरकार पूर्ण करेल. पूर्वीप्रमाणेच महाराजांचे गडकोट हाव्हेत.