मुंबईमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकासाठी लोकल आणि रेल्वे सेवा ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. दररोज लाखो लोक लोकल आणि रेल्वेने प्रवास करत असतात. अशातच तुम्ही देखील मुंबईमध्ये रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. पश्चिम रेल्वे आज पासून म्हणजेच दिनांक 11 नोव्हेंबर पासून विशेष गाड्या चालवणार आहे. यामध्ये मुंबई येथील वांद्रे टर्मिनस इथून नवीन गाडी आजपासून सुरू होणार आहे आणि या गाडीच्या दोन फेऱ्या होणार आहेत.
मुंबई ते हिसार दरम्यान ही गाडी चालवली जाणार असून वांद्रे टर्मिनस ते हिसार अशी एक फेरी आणि हिसार ते वांद्रे टर्मिनस अशी एक फेरी अशा या गाडीच्या दोन फेऱ्या असतील.
कसे असेल वेळापत्रक ?
मिळालेल्या माहितीनुसार ट्रेन क्रमांक 04725 हिस्सार-वांद्रे टर्मिनस सुपरफास्ट स्पेशल हिसारहून सोमवार, 11 नोव्हेंबर 2024 रोजी 05.50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 07.20 वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचणार आहे.
या गाडीची फक्त एक फेरी होणार आहे. तसेच गाडी क्रमांक 04726 वांद्रे टर्मिनस-हिसार सुपरफास्ट स्पेशल ट्रेन वांद्रे टर्मिनस येथून मंगळवार, 12 नोव्हेंबर 2024 रोजी 09.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 11.10 वाजता हिसारला पोहोचणार आहे.
‘या’ स्थानकांवर घेणार थांबे
बोरिवली, वापी, सुरत, भरूच, वडोदरा, गोध्रा, रतलाम, नागदा, भवानी मंडी, कोटा, सवाई माधोपूर, दुर्गापुरा, जयपूर, रिंगास, सीकर, नवलगढ, झुंझुनू, चिरावा, लोहारू आणि सादुलपूर स्थानकावर थांबा घेणार आहे.