खुशखबर ! पुण्याहून ‘या’ शहरासाठी धावणार विशेष रेल्वे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दसरा -दिवाळी हा वर्षातील सर्वात मोठा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यानिमित्ताने अनेकजण आपल्या आप्तेष्टांना भेटण्यासाठी आपल्या गावी जात असतात. अशा काळात अनेक प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. सणासुदीच्या काळात रेल्वेला होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वे विभागाकडून पुण्याहून विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे. याचा फायदा प्रवाशांना होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या विषयी अधिक माहिती…

पुणे ते करीमनगर विशेष रेल्वे

अतिरिक्त गर्दीचा विचार करून रेल्वे विभागाने पुणे रेल्वे स्थानकातून विशेष रेल्वे सोडण्याचे नियोजन केले आहे. ही विशेष रेल्वे पुणे ते करीमनगर दरम्यान धावणार आहे. या एक्सप्रेस ट्रेन मुळे पुणेकरांना तसेच पुण्याहुन मराठवाड्यात जाणाऱ्या प्रवाशांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. चला जाणून घेऊया वेळापत्रक

काय असेल वेळापत्रक ?

पुणे-करिमनगर-पुणे (०१४५१/५२) या विशेष साप्ताहिक रेल्वेच्या ८ फेऱ्या होणार आहेत. पुणे ते करीमनगर अशा चार आणि करीमनगर ते पुणे अशा चार फेऱ्या होणार आहेत. पुणे-करिमनगर ही रेल्वे २१ ऑक्टोबर, २८ ऑक्टोबर, ४ नोव्हेंबर अन ११ नोव्हेंबरला पुणे येथून रवाना होणार आहे. ही गाडी या दिवशी रात्री १०.४५ वाजता पुणे रेल्वे स्टेशन वरून रवाना होईल आणि करिमनगर येथे तिसऱ्या दिवशी पहाटे दोन वाजता पोहचणार आहे. परतीच्या प्रवासात ही विशेष एक्सप्रेस 23 ऑक्टोबर, 30 ऑक्टोबर, 6 नोव्हेंबर आणि 13 नोव्हेंबरला करीमनगर येथून रवाना होणार आहे. ही विशेष रेल्वे करीमनगर येथून रवाना झाल्यानंतर पुण्याला दुसऱ्या दिवशी सकाळी पावणेदहा वाजता पोहोचणार आहे.

मराठवाड्याच्या प्रवाशांना होणार फायदा

ही विशेष एक्सप्रेस ट्रेन मराठवाड्यातील नांदेड रेल्वे रेल्वे स्थानकावरून चालवली जाणार आहे. त्यामुळे पुण्यावरून मराठवाड्यात जाणाऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे. याशिवाय नांदेडसहित संपूर्ण मराठवाड्यातील जनतेला या ट्रेनमुळे जलद गतीने पुण्यात पोहोचता येणार आहे.