पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने जाणारा ट्रक पलटी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील वहागाव हद्दीत कराडहून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या एक ट्र्क पलटी होऊन अपघात झाला. शनिवारी पहाटेच्या सुमारास हि अपघाताची घटना घडली असून यामध्ये ट्रकची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुका हद्दीत सहा पदरीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे महामार्गावर सर्व्हिस रस्त्यावर खोदकाम करण्यात आले आहे. शनिवारी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून साताऱ्याच्या दिशेने ट्र्क क्रमांक (MH 43 BG 8057) हा निघाला होता. यावेळी ट्र्क वहागांव हद्दीत आला असता पाठीमागून येणाऱ्या बसने लेन बदलत ट्रकला एका बाजूने दाबले. चांकपणे पाठीमागून आलेल्या बसमुळे ट्रकचालकाचा ट्र्कवरील ताबा सुटला.

भरधाव वेगाने ट्र्क महामार्गावरून निघाला असताना तसेच ट्र्क चालकाचा ट्र्कवरील ताबा सुटल्यामुळे तो महामार्गालगतच्या सर्व्हिस रस्त्यावर लावलेले बॅरिकेट्स टोतुन सर्व्हिस रस्त्यावर जाऊन पलटी झाला. यामध्ये ट्रकचे पुढील बाजूकडील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे. महामार्गाचे काम सुरु असल्याने महामार्गालगत सर्विस रस्तेही खोदण्यात आले आहेत. त्यामुळे महामार्ग अरुंद बनला आहे. परिणामी वाहनांच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे.