Monday, January 30, 2023

मुख्याधिकारी रमाकांत डाकेची मुलाखत घेण्यासाठी 40 जणांची टीम

- Advertisement -

कराड । येथील टिळक हायस्कूलच्या आठवीच्या विद्यार्थ्यांनी कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची 40 विद्यार्थ्यांनी मुलाखत घेतली. शिकून उच्चपदस्थ अधिकारी होत असताना, कोण- कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत असते. त्याचबरोबर उच्चपदस्थ अधिकारी होण्यासाठी कोणत्या प्रयत्न करावे लागतात, याची माहिती विद्यार्थ्यांनी मुख्याधिकारी रमाकांत डाके त्यांची प्रत्यक्ष मुलाखत घेऊन जाणून घेतली.

टिळक हायस्कूलमधील इयत्ता आठवीच्या हिंदी विषयाच्या पुस्तकांमध्ये मधुबन हा मुलाखत वजा पाठ समाविष्ट आहे. या वर्गाची हिंदी विषय शिक्षक अविनाश भांदिर्गे यांनी मुलाखत हा पाठ केवळ चार भिंतीच्या आत शिकवण्यापेक्षा एखाद्या अधिकाऱ्याची प्रत्यक्ष मुलाखत घेऊन तो पाठ शिकण्याचा आनंद देण्याचे ठरवले. त्याप्रमाणे 40 विद्यार्थ्यांनी मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची मुलाखत घेण्याचे निश्चित केले. सदर मुलाखत सुमारे एक तास सुरू होती. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक जी. जी. अहिरे, पर्यवेक्षक एस. एस. शिंदे, एस. यु. बाबर नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisement -

या मुलाखतीमध्ये मुख्याधिकरी रमाकांत डाके यांचे बालपण, शैक्षणिक प्रवास, कौटुंबिक मदत, जीवनातील आदर्श मार्गदर्शक गुरू, शिक्षण प्राप्त करत असताना घेतलेले श्रम, त्यांच्या जीवनातील प्रेरक प्रसंग, विविध आलेल्या समस्या अडचणी घेतलेले कष्ट व उच्च पदावर विराजमान झाल्यानंतर झालेला आनंद, अधिकारी बनण्याचा आत्मविश्वास कसा निर्माण झाला. याबाबत विद्यार्थ्यांनी निर्भीडपणे मुख्याधिकाऱ्यांना विविध प्रश्न विचारले व त्या प्रश्नांची उत्तरे मुख्याधिकारी यांनी विद्यार्थ्यांना सविस्तरपणे दिली. मुलाखतीचे प्रश्न व मुलाखत हिंदी या विषयांमध्येच पार पडली. प्रास्ताविक अविनाश बांदिर्गे यांनी सांगितला. आभार एस. यु. बाबर यांनी मानले.