Wednesday, October 5, 2022

Buy now

बेस्ट बसचा भीषण अपघात ! घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमध्ये एक भीषण अपघात (accident) घडला आहे. यामध्ये बेस्ट बसने रिक्षाला, अक्षरशः फरफटत नेलं. टेम्पोलाही धडक दिली. ज्या रिक्षाला बेस्ट बसने चिरडलं, त्या रिक्षाचा चालक या अपघातातून (accident) थोडक्यात बचावला आहे. हा संपूर्ण अपघात त्या ठिकाणी असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला समजेल कि याची तीव्रता किती भयंकर होती, मंगळवारी दुपारच्या सुमारास हा अपघात (accident) झाला.

काय घडले नेमके ?
बेस्ट बस क्र. 326 या बसचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं. बस थांबवता येणं अशक्य झाल्यामुळे अखेर बसने एका रिक्षाला जोरदार धडक दिली. या रिक्षाच चालकही होती. याच रिक्षाला फरफटत बेस्ट बसने टेम्पोलही ठोकर दिली. सुदैवानं या अपघातात (accident) कोणतीही जीवितहानी झाली नाही, त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या अपघातात एकूण 5 जण जखमी झाले आहेत.

या अपघातामधील (accident) जखमी झालेल्या बस चालक आणि वाहकासह रिक्षा चालकावर जोगेश्वरीतील बाळासाहेब ठाकरे महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर जखमी प्रवाशांवर वेदांत खासगी रुग्णालय, दिंडोशी इथे उपचार सुरु आहेत.

हे पण वाचा :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुक्कामी सातारा दाैऱ्यावर

आता ‘या’ स्मॉल फायनान्स बँकेने देखील FD वरील व्याजदरात केली वाढ !!!

Kotak Mahindra Bank च्या एफडीवरील व्याज दरात वाढ !!!

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ‘हे’ मोठे निर्णय

EPFO कडून PF पैकी किती रक्कम शेअर्समध्ये गुंतवली जाते ???