चिंतेची बाब!! एकट्या पुणे शहरात JN.1 च्या एकूण 59 रुग्णांची नोंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| संपूर्ण देशभरात थैमान घातलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने ग्रामीण भागात शिरकाऊ करण्यास सुरुवात केली आहे. सध्या पुणे शहरामध्ये देखील कोरोनाचा नाव व्हेरिएंट JN.1 चे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. एकट्या पुणे शहरात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे 150 रूग्ण सापडले आहेत. तर गेल्या 24 तासात पुण्यात JN.1 च्या एकूण 59 रुग्णांची नोंद झाली आहे.

पुणे शहराबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले आहेत. शनिवारी पुणे शहरात सर्वाधिक 59 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे पुण्यातील एकूण रुग्णांची संख्या 150 वर पोहचली आहे. चिंताजनक बाब म्हणजे राज्यातील JN.1 च्या एकूण रुग्णांपैकी 60 टक्के रुग्ण एकट्या पुणे शहरात आहेत.

इतर शहरात किती रूग्ण

पुण्याबरोबर इतर शहरांचा आढावा घेता, नागपूरमध्ये 30 रुग्ण मुंबईत 22 रुग्ण सोलापूरमध्ये 9 रुग्ण, सांगलीत 7 रुग्ण, ठाण्यात 7 जळगावमध्ये 4, अहमदनगरमध्ये 3, बीडमध्ये 3 छत्रपती संभाजीनगरमध्ये 2, कोल्हापूरमध्ये 2 नांदेडमध्ये 2 नाशिकमध्ये 2 रूग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान, राज्यामध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 61 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 70 रुपये बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या राज्यात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.17 आहे. तर मृत्यू दर 1.81 टक्के इतका आहे.