औरंगाबाद : डबल सीट जाणाऱ्या मित्रांच्या दुचाकींच्या अपघात होऊन एक जण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास वाळूज औधोगिक वसाहतीतील रांजणगाव रोडवर घडली आहे.
पंढरी माणिक गवई (वय 23) रा.नेहरूनगर असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तर अनिल संजय वाघमारे (वय 22) रा.वाघाला ता.मंठा, जि. जालना, ह.मु.सातारा परिसर असे जखमींचे नावे आहेत.
या प्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की, पंढरी आणि अनिल हे दोघेही बांधकाम मिस्त्री आहेत. ते दिवसभराचा काम आटोपून रात्री 11 च्या सुमारास (एम.एच.20 एफ.वाय.2993) या क्रमांकाच्या दुचाकीवरून घरी जात होते. दरम्यान रांजणगाव रोड वरील व्हेरॉक कंपनी समोर तरुणांच्या दुचाकींचा अपघात झाला. या अपघातात पंढरी जागीच ठार झाला. तर अनिल गंभीरपणे जखमी झाला आहे. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला की मग अज्ञात वाहनाच्या धडकेने हा अपघात झाला. हे दुपार पर्यंत स्पष्ठ होऊ शकले नाही. या अपघाताची नोंद एम.आय.डी. सी.वाळूज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.