‘पुष्पा’ फिव्हर सातासमुद्रपार; ‘सामी सामी’ गाण्यावर रशियन महिलाही थिरकल्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदान यांच्या ‘पुष्पा द राईज’ या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका केला.अनेक भाषेत प्रदर्शित झालेल्या या सिनेमातील गाण्यांनी सर्वांनाच भुरळ घेतली आहे. रशियन नागरिकांना पुष्पा सिनेमातील गाण्यांचा फिव्हर चांगलाच चढला आहे. कारण सोशल मीडियावर रशियन महिलांचा भन्नाट डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. रशियन महिलांनी लहान मुलांसोबत पुष्पा सिनेमातील सामी सामी गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे.

पुष्पातील अल्लूचे डायलॉग्स आजही आवडीने प्रत्येकजण घेत आहेत. शिवाय यातील गाण्यांनीही प्रचंड वेड लावलं आहे. ‘पुष्पा’तील श्रीवल्ली, सामी सामी गाण्यानं बॉक्स ऑफिसवर तर धुडगूस घातला. लाखो सिनेचाहत्यांना या गाण्यातील डान्सही आवडला. अनेकांनी या गाण्यांवर जबरदस्त ठुमके लगावत रिल्स बनवून सोशल मीडियावर व्हायरल केल्याचंही समोर आले.

https://www.instagram.com/p/Cli_jz5Dv2B/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again

रशियन महिलांनाही ‘पुष्पा’तील ‘सामी सामी’या गाण्यांवर डान्स करायला आवडलं आहे. रशियन महिला चिमुकल्यांसोबत सामी सामी गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ मॉस्कोच्या ऐतिहासिक संग्रहालयात चित्रित करण्यात आला आहे. हा व्हिडीओ Natalia Odegova नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओला जवळपास 17 हजार व्यूज मिळाले आहेत.