महाराष्ट्रातील एका गावात 95 हजार एकराच्या शेताला बांधच नाही, 12 किमीचं शेत विनाबांध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – शेतीच्या बांधावरून (dams) होणारी भांडणे ही पिढ्यानपिढ्या चालूच आहेत. खासकरून महाराष्ट्रात याचं प्रमाण खूपच जास्त आहे. कधी कधी हा वाद इतका टोकाला जातो की एखाद्याचा जीवही जातो. यामुळे अनेकांना जीव गमवावा लागतो. इंचभर (dams) जागेवरून देखील हे वाद होतानाचे चित्र ग्रामीण भागात आहे. शेजारी तर सोडा पण सख्ख्या भावा भावात हे बांधावरून वाद झाल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात आहेत. पण हे सर्व बाजूला ठेवून तुम्हाला म्हंटलं कि एक गाव आहे जिथं शेतीला बांधच नाहीत, तर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना. पण हे खरं असून आपल्या महाराष्ट्रात एक गाव असं आहे. त्याबद्दल आज जाणून घेऊया..

शेकडो वर्षांची परंपरा
राज्यातील हे एकमेव गाव असेल जिथे बांधावरून (dams) कधीही भांडण झाले नाही आणि होतही नाही. या गावात शेताची हद्द निश्चित करण्यासाठी दगड लावले जातात किंवा झाडे लावले जातात. हे गाव सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात आहे. मंगळवेढा येथील शेतीला बांध न करण्याची शतकानुशतके जुनी परंपरा आहे. बांधावरून काही आक्षेप असले तरी ते आपसात सामोपचाराने तातडीने सोडवले जाते. या परिसरात संपूर्ण जमीन हि कोरडवाहू आहे. कुणाच्याही शेतात विहीर नाही. संपूर्ण शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. ज्वारी आणि हरभरा ही प्रमुख पिके म्हणून या भागात घेतली जातात. साधारणपणे वर्षातून एकच पीक या भागात घेतले जाते जे कि पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते.

12 किलोमीटरपर्यंत अशीच शेती
मंगळवेढा म्हणजे ज्वारीचे काेठार. या शिवाराच्या शेतात कुठेही बांध नाही. मंगळवेढा-साेलापूर राेडलगत शेताच्या चारही दिशांना 12 किलाेमीटरपर्यंत शेतात बांधच (dams) नाहीत. हे क्षेत्र थोडे थोडके नसून तब्बल 38 हजार हेक्टर आहे. म्हणजेच 95 हजार एकर आहे. आता विचार करा कि एवढी जमीन कशी बिना बांधाची असू शकते. पण म्हणतात ना सर्वांचे विचार सारखे असले आणि समजूतदारपणाची भूमिका असेल तर सर्व काही शक्य होऊ शकतं.

सुपीक जमीन, तशी माणसेही समजदार
या भागातील जमीन सुपीक आणि सपाट आहे. 40 फुटांपर्यंत काळी माती असल्याने जमिनीचा पाेत बदलत नाही. पावसामुळे या जमिनीत बांध टिकत नाहीत. मग शेतकरी शीव किंवा हद्द ओळखू यावी म्हणून फक्त एक फुटाचा दगड उभा करतात किंवा एखादे झाड लावतात.

एकमेकांना समजून घेत शेती
बांधावरून भांडणे झाल्याचे आपण अनेकदा ऐकतो. कधी कधी जीवही जातो. पण, मंगळवेढ्यात शेतकरी एकमेकांना समजून घेऊन मार्ग काढतात. बांधावरून भांडण कधीच होत नाही असे गावातील सेवानिवृत्त शिक्षक व शेतकरी ग्यानीबा फुगारे यांनी सांगितले.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय