आरोग्य केंद्रात डॉक्टर आणि कर्मचारी नसल्याने महिलेची भरपावसात रस्त्यावरच प्रसूती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जालना : हॅलो महाराष्ट्र – आपला देश विकासाच्या दिशेने प्रयत्न करत आहे मात्र अजूनही काही खेडेगावांमध्ये लोकांना सुविधांअभावी अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे. सध्या जालन्यामध्ये अशीच एक घटना घडली आहे. यामध्ये एका महिलेची भरपावसात रस्त्यावरच प्रसूती (a woman gives birth to baby on street) करण्यात आली. या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर आणि कर्मचारीच नसल्याने महिलेनं भरपावसात रस्त्यावरच बाळाला जन्म (a woman gives birth to baby on street) दिला.

कुठे घडली हि घटना ?
ही घटना जालन्यातील अंबड तालुक्यातील वडीगोद्री या ठिकाणी घडली आहे. रुपाली हारे असे रस्त्यावर प्रसूती (a woman gives birth to baby on street) झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेचा एक व्हिडिओसुद्धा समोर आला आहे. भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असतानाच अजूनही अनेक ठिकाणी मुलभूत सुविधांची वाणवा असल्याचे या प्रकारावरून लक्षात येते.

अशीच काहीशी आणखी एक घटना अहमदनगरमध्येदेखील घडली आहे. यात अंत्यसंस्कारासाठी जागा नसल्याने भर पावसात ताडपत्री हातात धरून अंत्यविधी करावा लागला. वरून पाऊस तर खाली चिखलात चितेची अग्नी आणि त्यामध्ये फाटकी ताडपत्री धरून अंत्यविधी उरकणाऱ्या या नागरिकांचा व्हिडिओमध्ये समोर आला होता.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल

शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय

Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???

सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???

ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!