अजब प्राणीप्रेम ! एका फ्लॅटमध्ये 350 मांजरांसह राहते महिला, सोसायटीतील इतर रहिवासी त्रस्त

0
2
pune cat news
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

प्राणी पाळायला बऱ्याच जणांना आवडतात. मात्र पुण्यातील एका महिलेचं प्राणी प्रेम म्हणजे शेजाऱ्यापाजाऱ्यांना वैताग होऊन बसले आहे. पुण्यातील हडपसर भागातील एका महिलेने एक दोन नव्हे तर तब्बल ३५० मांजरं पाळली आहेत. त्यामुळे याचा नाहक त्रास सोसायटीतील इतर रहिवाशांना होत आहे. चला जाणून घेऊया हे नेमकं प्रकरण काय आहे ?

मिळलेल्या माहितीनुसार, पुण्यातील हडपसर भागातील मारवल बाऊंटी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये एका महिलेने तब्बल 350 मांजरी घरात पाळलया आहेत आणि याच्यामुळेच सोसायटीमधील आजूबाजूचे लोक त्रस्त आहेत. एवढेच नाही तर मोठ्या संख्येने मांजरी असल्यामुळे दुर्गंधी, आवाज आणि स्वच्छतेच्या समस्यांनी इथले रहिवासी हैराण झाले आहेत. याबाबतची तक्रार इथल्या नागरिकांनी केली आहे मात्र त्याची दखल घेतली जात नसल्याचं आणि मालकही काही प्रतिसाद देत नसल्याचं इथल्या रहिवाशांचं म्हणणं आहे.

इथल्या रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार 2020 मध्येच पुणे महानगरपालिका आणि पोलिसांकडं याबाबत संबंधित महिलेची तक्रार केली होती. त्यावेळी या महिलेकडे 50 मांजरी असल्याचे समोर आले होते. मात्र ५ वर्षात ही संख्या वाढून आकडा तब्बल 350 वर जाऊन पोहोचला आहे. रहिवाशांच्या तक्रारीनंतर पालिका प्रशासनाने या महिलेवर कारवाईची नोटीस बजावली आहे.

मोठ्या संख्येने असलेल्या या मांजरांमुळे आजार पसरू शकतात त्यामुळे त्वरित योग्य ती कारवाई करावी गेल्या पाच वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असून प्रशासनाने योग्य पावलं उचलावेत अशी मागणी इच्छा रहिवाशांनी केली आहे. या विचित्र घटनेमुळे मात्र पुणेकरांमध्ये चर्चेला उधाण आले असून महापालिका पुढील काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.