मोबाईलवरून पतीसोबत झाली भांडण; पत्नीने दोन मुलांना घेऊन उचलले टोकाचे पाऊल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशच्या ललितपूर येथे एका महिलेवर मोबाईलचे वेड जीवावर बेतले आहे. मोबाईलच्या कारणावरून पतीशी वाद झाल्यामुळे एका महिलेने स्वतःला आणि आपल्या दोन मुलांना संपवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यात महिलेचा आणि मुलीचा मृत्यू झाला असून तिचा मुलगा अजूनही मृत्यूची झुंज देत आहे. या घटनेमुळे ललितपुर हादरून गेले आहे. तर या सर्व घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. नक्की वाद कोणत्या कारणावरुन झाला याबाबतची ठोस माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नाही.

विष प्राशन करून जीवन संपवले

समोर आलेल्या माहितीनुसार, रविवारी 25 वर्षीय महिलेचे आपल्या पतीशी मोबाईलच्या कारणावरून भांडण झाले होते. भांडण झाल्यानंतर रागात तिचा पती बाहेर निघून गेला. परंतु दुसरीकडे रागाच्या भरात पत्नीने आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. या महिलेने सर्वात प्रथम 6 वर्षांची मुलगी आणि 3 वर्षांचा मुलगा या दोघांना विष पाजले आणि नंतर ते स्वतः ही घेतले. दोन्ही मुलांची बिघडलेली तब्येत पाहून तिच्या वहिनीने पोलिसांना बोलावून घेतले.

त्यानंतर या तिघांना देखील रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु तोपर्यंत उशीर झाल्यामुळे महिलेचा आणि मुलीचा मृत्यू झाला. सध्या 3 वर्षांचा मुलगा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. या सर्व घटनेचा सध्या पोलीस तपास घेत आहेत. तर महिलेच्या पतीची देखील चौकशी सुरू आहे. त्याने देखील मोबाईल वरूनच वाद झाल्याचे पोलिसांना सांगितले आहे. मात्र एवढ्या किरकोळ कारणावरून आत्महत्या केल्यामुळे पोलिसांना देखील आश्चर्य वाटत आहे.

दरम्यान, यापूर्वी देखील मोबाईलचा कारणामुळे अशा अनेक घटना घडल्या आहेत त्यामध्ये टोकाचे पाऊल उचलले गेले आहे. सध्याच्या काळात मोबाईल मनुष्याच्या आयुष्यातील सर्वात जीवनावश्यक वस्तू बनली आहे. परंतु त्याचे विपरीत परिणाम देखील तितकेच दिसून येत आहेत.