दारू प्यायला पैसै न दिल्याने महिलेचा डोक्यात दगड घालून खून : संशयिताला 4 तासात अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | तळबीड (ता. कराड) येथील मानकर वस्तीवर राहत्या घरी महिलेच्या डोक्यात दगड घालून तिचा खून करण्यात आला. गुरुवारी (दि. 5) सकाळी 10.30 वाजता ही घटना घडली. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. दरम्यान, महिलेचा खून चोरीच्या उद्देशाने झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अवघ्या 4 तासात तळबीड पोलिसांनी संशयित आरोपीस गजाआड केले आहे. संशयिताने सदरील महिलने दारू प्यायला पैसे न दिल्याने तिचा खून केल्याचे व चोरी केल्याचे सांगितले. विमल कृष्णत चव्हाण (वय- 70, रा. मानकर वस्ती-तळबीड, ता. कराड) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबतची फिर्याद प्रकाश चव्हाण यांनी दिली आहे. तर या प्रकरणात घराशेजारी आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी प्रकाश कृष्णत चव्हाण हे आपल्या आई, पत्नी समवेत एक वर्षापासून तळबीड येथील मानकर वस्तीत राहत आहेत. प्रविण हे एमआयडीसीमध्ये हमालीचे काम करतात. तर त्यांची पत्नी एका कंपनीत कामास आहे. प्रकाशची आई विमल चव्हाण या काही महिन्यांपूर्वीच त्यांच्याकडे राहण्यास आली होती. दरम्यान, गुरुवारी सकाळी पावणे दहा वाजता प्रकाश चव्हाण हे आपल्या पत्नीस एमआयडीसीतील कंपनीत कामावर सोडण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांना हमालीचे काम नसल्यामुळे ते 10:30 वाजता परत आपल्या घरी आले. यावेळी त्यांना आई हॉलमध्ये निपचित पडलेली दिसली. जवळ जाऊन पाहिले असता त्यांच्या आईच्या डोक्यात कुणीतरी मोठा दगड घातला होता. त्यामुळे डोक्याच्या पाठीमागून रक्त येत होते. हे पाहून प्रकाश चव्हाण यांनी आरडाओरडा करीत शेजारच्या लोकांना बोलावले. खून झाल्याचे समजताच घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली होती.

तळबीड पोलिसांकडून 4 तासात खुनाचा उलगडा
स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकाने फिर्यादी तसेच आजूबाजूचे साक्षिदार लोकांचेकडे विचारपूस केली. तेव्हा मयत यांचे घराचे जवळ राहणाऱ्या एका इसमाने मयत महिलेस दारु पिण्याकरीता पैसे मागीतले होते. परंतू सदर महिलेने त्यास पैसे दिले नव्हते. त्याबाबत त्या महिलेने तिचा मुलगा (फिर्यादी) यास घरी आल्यानंतर सांगितले होते. दारु पिण्याकरीता पैसे पाहिजे असल्याने, त्या इसमाने सदर महिलेचा खुन करुन तिचे गळ्यातील सोन्याची बोरमाळ व कानातील कर्नफुल चोरी केले असल्याचा संशय फिर्यादी व आजूबाजूचे साक्षिदार यांनी व्यक्त केला. स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकास व स.पो.नि. जयश्री पाटील यांनी संशयित इसामाचा शोध घेण्यास सुरुवात केली. सदरील व्यक्ती हा उसाच्या रानात लपून बसला असल्याची माहिती मिळाल्याने त्याचा तो लपून बसलेल्या ऊसाचे रानात शोध घेवून त्यास ताब्यात पोलिसांनी घेतले. त्याचेकडे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी स्वतः व तपास पथकाने कौशल्यपूर्वक विचारपूस केली. महिलेने दारु पिण्याकरीता पैसे मागितले होते, परंतु तिने पैसे दिले नाही. याचा राग मनात धरुन घरामध्ये महिला एकटी असताना तिच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केल्याचे सांगितले.

पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर व कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस अंमलदार शरद बेबले, साबीर मुल्ला, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, मुनीर मुल्ला, गणेश कापरे, स्वप्नील दौंड, धीरज महाडीक, विशाल पवार, मोहसिन मोमीन, पंकज बेसके व तळबीड पोलीस ठाण्याकडील सहायक पोलीस निरीक्षक जयश्री पाटील, पोलीस अंमलदार बाकले, पिसाळ, ओंबासे, दिक्षीत, विभुते यांनी सदरची कारवाई केली.